Bigg Boss फेम शिव ठाकरे या कारणामुळे राहतो भाड्याच्या घरात, त्याच्या आईनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 16:20 IST2023-01-14T16:20:40+5:302023-01-14T16:20:40+5:30
Shiv Thakare : बिग बॉस १६च्या घरात सध्या मराठमोळ्या शिव ठाकरेची बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. शिवने उत्तम खेळत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तो नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Bigg Boss फेम शिव ठाकरे या कारणामुळे राहतो भाड्याच्या घरात, त्याच्या आईनेच केला खुलासा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १६ (Bigg Boss 16) सध्या खूप चर्चेत आहे आणि बिग बॉस १६च्या घरात सध्या मराठमोळ्या शिव ठाकरे(Shiv Thakare)ची बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. शिवने उत्तम खेळत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तो नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. आताही शिव त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे आणि त्याच्या खासगी आयुष्याचे खुलासे खुद्द त्याच्या आईनेच केले आहेत.
एका मुलाखतीत शिवच्या आईला शिवची लाईफस्टाईल, त्याचा स्वभाव, त्याचे घर या सगळ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना शिव भाड्याच्या घरात राहत असल्याचं शिवच्या आईने सांगितले. शिवची आई म्हणाली की, शिव डान्स चांगला करतो. २०० ते ३०० मुलांना तो अमरावतीमध्ये डान्स शिकवतो. त्याची जी मॅनेजर आहे तीही शिवबरोबर डान्स क्लास घेते. शिवची मॅनेजर मुलांच्या डान्सचा सराव घेते. त्या मधल्या दिवसांमध्ये शिव मुंबईमध्ये कामानिमित्त येतो.
मुंबईमधलं काम पाच ते सहा दिवसांमध्ये तो उरकतो. तसेच पुन्हा अमरावतीमध्ये येतो. म्हणूनच त्याने फ्लॅट घेतला आहे. पण हा फ्लॅट भाड्यवर आहे. आमचं स्वतःचं ते घर नाही, असं उत्तर शिवच्या आईने दिले आहे.
नुकतीच शिव ठाकरेची आई बिग बॉसच्या घरात सुद्धा आली होती. यावेळी तिने घरातल्यांसोबत खूप छान वेळ घालवला. शिवची आई घरातून बाहेर जाताना शिवसोबतच घरातील इतर सदस्य देखील भावूक होताना दिसले.