म्हणे माझ्यात दैवी शक्ती, सोफिया हयातने केले त्या न्यूड फोटोचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:16 AM2020-04-22T10:16:17+5:302020-04-22T10:17:07+5:30
काय आहे सोफियाचा दावा
बिग बॉसमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिने अलीकडेच एक वाद ओढवून घेतला. होय, इन्स्टा अकाऊंटवर काही न्यूड फोटो शेअर करून तिने खळबळ उडवून दिली. हिंदूंसाठी पूज्य मानल्या जाणा-या ओम या धार्मिक प्रतिकासमोर आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो तिने शेअर केले. एवढेच नाही यानंतर एका हिंदू देवतेचा आक्षेपार्ह फोटोही तिने शेअर केला. तिच्या पोस्ट बघताच सोशल मीडियावर युजर्सच्या संतापाचा भडका उडाला. एका युजरने तिच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रारही दाखल केली. आता सोफियाने या न्यूड फोटोंवर खुलासा केला आहे. होय, मी येशू ख्रिस्ताचा अवतार आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, असा दावा तिने एका व्हिडीओतून केला आहे.
काही वर्षांपूर्वी सोफिया नन बनली होती. तिने ट्विटरवरून याबाबत तिच्या फॅन्सना माहिती दिली होती. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे आपण नन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने जाहीर केले होते. यानंतर बरेच दिवस ती ननच्या वेशात वावरताना दिसली होती. मात्र काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदलला होता आणि यानंतर अचानक तर शॉर्ट कपड्यांवर आली होती. एवढेच नव्हे तर ती लग्नबंधनातदेखील अडकली होती. (अर्थात वर्षभरातच ती पतीपासूनही विभक्त झाली.) यानंतर अनेकदा स्वत:चे न्यूड, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला.
आपल्या अशा कारनाम्यांमुळे सोफियाला अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची तर काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली होती. पण सोफियाला यामुळे काहीही फरक पडला नाही़ आता तर तिने आपण थेट दैवी अवतार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
काय आहे सोफियाचा दावा
ती म्हणते, येशू ख्रिस्ताचा अवतार, महिला इसा मसिह म्हणून लोक मला ओळखत नाहीत याचे मला खूप वाईट वाटते. मला देवाने अनेक शक्तीही दिल्या आहेत. मीडियातील एका व्यक्तीला माझ्यातील शक्तीबाबत माहिती आहे. त्याला मी हे गुपित ठेवायला सांगितले होते. त्याने मला शिवलिंगात पाहिले होते. माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवे आणि हे मी उघडपणे बोलत आहे. जुन्या काळात शक्तिसंपन्न महिलांना संपवले जायचे. लोकांनी इसा मसीहला मारले होते. अनेक वर्षे लोकांनी मदर मेरीचा पाठलाग केला होता. तुम्हाला काय वाटतं मी वेगळी आहे का?