बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलेने केली निक्कीची नक्कल, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:40 AM2024-09-24T10:40:50+5:302024-09-24T10:41:36+5:30

सध्या सगळीकडे निक्की आणि अरबाज यांचीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे. 

Bigg Boss fame Yogita Chavan's husband Saurabh Chowghule imitated nikki tamboli Video | बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलेने केली निक्कीची नक्कल, पाहा Video

बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलेने केली निक्कीची नक्कल, पाहा Video

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना घरात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला. 'बिग बॉस'च्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता. जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं, तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती. तिची अगदी वाईट अवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या सगळीकडे निक्की आणि अरबाज यांचीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे. 

सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाणचा पती आणि मराठी अभिनेता सौरभ चौघुले हा निक्कीची नक्कल करताना पाहायला मिळाला. योगिता चव्हाणने सौरभचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहलं, 'भाऊच्या धक्क्यानंतर झालेले परिणाम'. या व्हिडीओमध्ये सौरभ हा निक्कीसारखं रडताना दिसतोय.  'कुठे गेला तू अरबाज, मी कशी जगू' असे म्हणत तिची नक्कल करताना तो पाहायला मिळाला. 


सौरभची पत्नी योगिता ही तिसऱ्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. योगिता ही 21 दिवस बिग बॉसच्या घरात राहिली. पण घरातील भांडणं, राडे या सगळ्यांमुळे तिला घरातील वातावरण फारसं आवडतही नव्हतं. तिने भाऊच्या धक्क्यावर दुसऱ्या आठवड्यातच रितेश भाऊंना घराबाहेर जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये योगिताचा खेळही सगळ्यांना आवडला. त्याचं कौतुकंही झालं. पण तिसऱ्या आठवड्यात तिला घराबाहेर पडावच लागलं होतं. योगिता ही एक मराठी अभिनेत्री आहे. तर तिचा पती सौरभादेखील लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. 

Web Title: Bigg Boss fame Yogita Chavan's husband Saurabh Chowghule imitated nikki tamboli Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.