Bigg Boss Grand Finale: मीनल पाठोपाठ उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरातून बाहेर; आता राहिले फक्त Top 3 फायनलिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:40 IST2021-12-26T21:31:08+5:302021-12-26T21:40:11+5:30
Bigg Boss Grand Finale: आज रंगलेल्या बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये मीनल शहा पाठोपाठ उत्कर्ष शिंदेचादेखील प्रवास थांबला आहे.

Bigg Boss Grand Finale: मीनल पाठोपाठ उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरातून बाहेर; आता राहिले फक्त Top 3 फायनलिस्ट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहिलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg Boss marathi). सध्या या शोच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले सोहळा रंगत आहे. जवळपास १०० दिवस या घरात राहिल्यानंतर मीनल शहा या घरातून बाहेर पडली. तिच्याच पाठोपाठ आता उत्कर्ष शिंदे देखील बाहेर पडला आहे. त्यामुळे आता बिग बॉसला त्यांचे शेवटचे Top 3 फायनलिस्ट मिळाले आहेत. म्हणूनच, आता प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं दिसून येत आहे.
आज रंगलेल्या बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये मीनल शहा पाठोपाठ उत्कर्ष शिंदेचादेखील प्रवास थांबला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या मतामुळे जय, विकास आणि विशाल सेफ झाले आहेत. त्यामुळेही तीनही स्पर्धक आता टॉप ३ फायनलिस्ट ठरले आहे.
दरम्यान, उत्तम टास्क खेळण्याची पद्धत आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय यामुळे उत्कर्ष शिंदे याला यंदाच्या पर्वातील मास्टर माईंड ही नवीन ओळख मिळाली होती. त्यातच उत्कर्ष यंदाच्या पर्वाचा विजेता ठरेल असंही अनेकांना वाटलं होतं. मात्र, त्याचा हा प्रवास अर्ध्यावरच थांबला आहे.