बिग बॉस : कॅप्टन बनताच लोपाने दिला यांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 04:06 PM2016-12-16T16:06:27+5:302016-12-16T17:35:12+5:30

पुन्हा एकदा कॅप्टनशिपची धुरा लोपामुद्रा राऊत हिच्याकडे आली आहे. पहाटेच्या साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या टास्कमध्ये लोपाने मनवीरच्या हातून कॅप्टनशिपची ...

Bigg Boss: Lopa gets bail as Captain gets suspended | बिग बॉस : कॅप्टन बनताच लोपाने दिला यांना दंड

बिग बॉस : कॅप्टन बनताच लोपाने दिला यांना दंड

googlenewsNext

पुन्हा एकदा कॅप्टनशिपची धुरा लोपामुद्रा राऊत हिच्याकडे आली आहे. पहाटेच्या साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या टास्कमध्ये लोपाने मनवीरच्या हातून कॅप्टनशिपची रिंग हिसकावून घेत कॅप्टनशिप जिंकली. त्याचबरोबर घरातील काही सदस्यांसाठी ही कॅप्टनशिप म्हणजे धोक्याची घंटा असल्याचेही संकेत दिले. विशेष म्हणजे सध्या अगदी तसेच घडताना दिसत आहे. लोपाने कॅप्टनशिपच्या अधिकाराचा वापर करीत एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांना दंड ठोठावत त्यांच्याप्रती असलेला राग व्यक्त केला.

ज्याप्रमाणे घरातील लव्ह स्टोरी हिट होत आहेत, तशीच बानी आणि लोपामधील कॅटफाइटही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. मात्र आता यात प्रियंका जग्गा हिने उडी घेतल्याने सध्या लोपा, बानी आणि प्रियंका जग्गा असा सामना बघावयास मिळत आहे. जेव्हा मनवीर, लोपा आणि बानीमध्ये कॅप्टनशिपचा टास्क खेळला गेला तेव्हा प्रियंकाने लोपाच्या चेहºयावर पाणी उडवित तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र लोपाने अखेरपर्यंत टास्कमधून माघार न घेता बानी आणि मनवीरला जबरदस्त फाइट दिली. मध्येच बानी या टास्कमधून बाहेर पडल्याने लोपा आणि मनवीरमध्ये पहाटेच्या साडेचार वाजेपर्यंत हा टास्क चालला. अखेर लोपाने मनवीरच्या हाताला झटका देत कॅप्टनशिपची रिंग जिंकली.

मात्र यादरम्यान तिला ज्या-ज्या सदस्यांनी त्रास दिला त्या सर्वांना दंड ठोठावत तिने राग व्यक्त केला. अर्थात यातील पहिले नाव बानी जे हे होतेच, याशिवाय प्रियंका जग्गा, नितिभा कौर, स्वामी ओम आणि गौरव चोपडा यांचीही नावे तिने दंडासाठी पात्र असल्याचे बिग बॉसला सांगितले. लोपाच्या यादीत आपले नाव असेलच हे अपेक्षित असलेल्या बानीने सर्वांसमोर लोपाला भरेबुरे सुनावले. लोपानेही नेहमीप्रमाणेच बानीच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देत शोच्या अखेरपर्यंत तुझ्याशी जमवून घेणे अशक्य असल्याचे सांगितले.

दोघींचा हा वाद सुरू असतानाच प्रियंकानेही लोपाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. प्रियंकाने बेडरूममध्ये येऊन ‘जेव्हा माझ्याकडे कॅप्टनशिप येईल तेव्हा तुला काय त्रास देईल याचा तू विचारही करू शकणार नाहीस’ अशी धमकीच दिली. लोपानेही तिला ‘चीप गर्ल’ असे म्हणत तिचे उणेदुणे काढले.

स्वामीचा जेवणावरील असाही बहिष्कार

जोपर्यंत प्रियंका जग्गा मला माफ करणार नाही, तोपर्यंत मी जेवण करणार नाही, असा पवित्रा घेणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमचा जेवणावरील बहिष्कार प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारा होता. अन्नाचा एकही कण खात नसल्याचा बहाणा करणारा स्वामी ओम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत किचनमधील फळे तरुंगातील बाथरूममध्ये खात असल्याचे प्रेक्षकांना बघावयास मिळाले. दुसºया दिवशी मात्र स्वामी ओमने नेहमीप्रमाणेच चलाखी करीत मी खूप अशक्त झालो आहे, माझ्यात आता त्राण उरला नाही, मी केव्हाही मरू शकतो, अशाप्रकारचा कांगावा करण्यास सुरुवात केली. अखेर प्रियंकाने स्वामी ओमला दोन घास भरवत जेवण करण्यास सांगितले.

Web Title: Bigg Boss: Lopa gets bail as Captain gets suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.