बिग बॉस : मनू, प्रियंकाच्या कमबॅकने घरात घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 02:14 PM2016-12-14T14:14:11+5:302016-12-14T15:37:01+5:30

गेल्या आठवडाभरापासून सिक्रेट रूममध्ये असलेल्या प्रियंका जग्गा अन् नंतर तिच्या साथीला आलेल्या मनू पंजाबी यांची घरात वापसी झाली आहे. ...

Bigg Boss: Manu, Priyanka's Comeback, Ghagasan in the house | बिग बॉस : मनू, प्रियंकाच्या कमबॅकने घरात घमासान

बिग बॉस : मनू, प्रियंकाच्या कमबॅकने घरात घमासान

googlenewsNext
ल्या आठवडाभरापासून सिक्रेट रूममध्ये असलेल्या प्रियंका जग्गा अन् नंतर तिच्या साथीला आलेल्या मनू पंजाबी यांची घरात वापसी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल भले-बुरे बोलणाºया घरातील अन्य सदस्यांवर ते बरसले असून, घरात पुन्हा एकदा घमासान बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कमबॅकमुळे एकेकाळचे निर्माण झालेले घट्ट नातेसंबंध दुरावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 

A lot of relations change as #ManuPunjabi & #PriyankaJagga finally come back into the Bigg Boss house! Don't miss tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 13, 2016}}}} ">http://

}}}} ">A lot of relations change as #ManuPunjabi & #PriyankaJagga finally come back into the Bigg Boss house! Don't miss tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 13, 2016

‘वीकेण्ड का वॉर’च्या एपिसोडमध्ये प्रियंका जग्गाला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले होते. स्वामी ओमनंतर घरवाल्यांच्या दृष्टीने खलनायक असलेल्या प्रियंका जग्गाच्या जाण्याने घरातील काही सदस्यांनी अक्षरश: सेलिब्रेशन केले होते. लोपामुद्रा राऊत हिने तर प्रियंकाला ‘घरातील घाण’ असल्याचे संबोधले होते. राहुल देव, रोहन यांनीही ती गेल्याचे समाधान वाटत असल्याचे म्हटले होते.



विशेष म्हणजे ‘मेरी बेटी’ म्हणणाºया स्वामी ओमने पहिले दोन दिवस गयावया केल्यानंतर बानीचा राग दूर करण्यासाठी प्रियंकानेच मला तुझ्या आई प्रती चुकीचे बोलण्यास सांगितले होते, असा आरोपही केला होता. हे सर्व सिक्रेट रूममध्ये बसून बघत असलेली प्रियंका मात्र घरातील सदस्यांच्या आरोपांची नोंद ठेवत होती. तिचा सर्वांत जास्त संताप स्वामी ओमने केलेल्या आरोपामुळे झाला. सिक्रेट रूममध्येच तिने टीव्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या स्वामी ओमकडे चप्पल दाखवित तुला बघून घेईल, असा दम दिला. 



त्यातच मनूही तिच्या साथीला आल्याने घरात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, याचा दोघांनाही अंदाज घेता आला. मनूला मोनाची गौरवप्रती वाढत असलेली जवळीकता बघून धक्का बसलाच शिवाय एकेकाळचा सर्वांत जीवलग मित्र असलेला मनवीर त्याच्याप्रती काय विचार करतो हेही त्याला बघायला मिळाले. मंगळवारच्या एपिसोडमध्ये नितीभा आणि स्वामी ओमबरोबर बोलताना मनवीरने मनू घरात परतणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे मनूचा चांगलाच संताप झाला होता. तसेच नितीभाशी जवळीकता निर्माण करणारा मनवीर मोनालिसाला का दूर करीत आहे, हेही त्याला आश्चर्यकारक वाटले. त्यामुळे दोघेही घरात जाण्याच्या प्रतीक्षेत होते. 



आता दोघेही घरात परतले असून, त्यांच्याविषयी भले-बुरे बोलणाºयांवर ते अक्षरश: बरसत आहेत. घरात परतल्याबरोबरच प्रियंकाने स्वामी ओमला सुनावताना ‘तू जगातील सर्वांत नालायक व्यक्ती आहेस’ असे म्हटले. त्यामुळे एकेकाळची ‘बेटी’ आता स्वामी ओमच्या निशाण्यावर आली आहे. दोघांमधील नात्यात दरार पडली असून, पुढील काळात यांच्यातील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. 
तर दुसरीकडे मनूने मोनालिसाला टोमणे मारताना ‘तू चांगली खेळत आहेस’ असे म्हणत अप्रत्यक्ष आपल्यातील नात्यात दरार निर्माण झाल्याचे संकेतच दिले आहेत. तसेच एकेकाळचा जीवलग मित्र असलेल्या मनवीरच्याही गेम प्लॅनवर तो तिरकसपणे प्रतिक्रिया देत आहे. 
त्यामुळे एकेकाळी घरात निर्माण झालेले संबंध आता तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याने गेममध्ये राहण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांशी पंगा घेण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे नव्या नात्यांची वीण बांधली जात असल्याने घरातील वातावरण आणखीच तप्त होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Bigg Boss: Manu, Priyanka's Comeback, Ghagasan in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.