फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:01 IST2022-08-25T16:01:05+5:302022-08-25T16:01:44+5:30
Rajesh shringarpure: बऱ्याचदा हे कलाकार त्यांच्या बदललेल्या लूकमुळे ओळखताही येत नाहीत. सध्या अशाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा
प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्वत:मध्ये अनेक बदल करत असतो. यात अगदी लूकपासून ते बोलीभाषेपर्यंत प्रत्येक गोष्ट तो जाणीवपूर्वक नव्याने आत्मसाद करत असतो. परंतु, बऱ्याचदा हे कलाकार त्यांच्या बदललेल्या लूकमुळे ओळखताही येत नाहीत. सध्या अशाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर सध्या बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेला हा अभिनेता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याचं हे बदलेलं रूप पाहून चाहते सैराट झाले आहे.
फोटोमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राजेश शृंगारपुरे आहे. बिग बॉस मराठीमध्ये राजेश त्याच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीसह वादग्रस्त गोष्टींमुळेही चर्चेत राहिला.
"मल्हाररावांचं काही महत्त्वाच्या वाक्यांपैकी माझ्या तोंडून उद्गारलेलं हे वाक्य प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची शिकवण देतं. "जो सही है, वो लाखों लोगों के गलत ठहराने के बाद भी, सही रेहता है", असं कॅप्शन देत राजेशने हा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, या फोटो आणि कॅप्शनवरुन राजेशचा हा लूक त्याच्या चित्रपटातील असल्याचं स्पष्ट होतं. बिग बॉस मराठीनंतर राजेश मराठीमध्ये फारसा कुठे दिसला नाही.मात्र, सध्या तो 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या हिंदी मालिकेत मल्हारराव होळकर यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठीच त्याने हा गेटअप केला आहे. मात्र, या लूकमध्ये त्याला कोणीही पटकन ओळखत नसल्याचं पाहिलं जातं.