Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले झळकणार आहे एका हिंदी अल्बममध्ये, पाहा त्याचा पहिला लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 15:43 IST2019-08-08T15:42:27+5:302019-08-08T15:43:38+5:30
या अल्बमच्या पोस्टरवर आपल्याला अभिजीत आणि आशा यांना पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले झळकणार आहे एका हिंदी अल्बममध्ये, पाहा त्याचा पहिला लूक
बिग बॉस मराठी सीझन २ मधून घराघरात पोहचलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र जेव्हा बिचुकले घरातून एक्झिट घेणार कळताच त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पुन्हा एकदा बिचुकलेला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच ये रे ये रे पैसा 2 या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. या चित्रपटाच्या टीमने या घरात खूप धमाल मस्ती केली. ही टीम बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अभिजीत बिचुकले आपल्याला गाणे गाताना दिसला. त्यावेळी या चित्रपटाच्या टीममधील संजय नार्वेकरने त्याला विचारले की, तुम्ही चांगले गाता तर अशा गाण्यांचा अल्बम का नाही बनवत... त्यावर अभिजीतने सांगितले की, मी एक अल्बम बनवला असून माझा तो अल्बम आशा सूरपूरसोबत आहे. पण अद्याप तो रसिकांच्या भेटीस आला नाही.
अभिजीतने या अल्बमचा उल्लेख केल्यानंतर आता आशाने तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर या अल्बमचा पहिला लूक पोस्ट केला आहे. या अल्बमच्या पोस्टरवर एबी म्हणजेच अभिजीत बिचुकलेच्या नवीन हिंदी अल्बमचा पहिला लूक असे लिहिण्यात आले आहे. या पोस्टरवर आपल्याला अभिजीत आणि आशा यांना पाहायला मिळत असून अभिजीतचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये अभिजीत रोमँटिक अंदाजात देखील दिसत आहे.
एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले. बिग बॉस शोमुळे बिचुकलेची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. त्याच्या अटकेनंतर गुगलवर अभिजीत बिचुकले नावाचा सर्च वाढला होता. सर्चच्या बाबतीत त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले होते.