माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:16 IST2022-03-01T19:15:08+5:302022-03-01T19:16:22+5:30
Bigg boss marathi 2 actors: माधव देवचके आणि हिना पांचाळ या जोडीने o antava या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांचा अशा पद्धतीचा डान्स पाहायला मिळाला.

माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले. मात्र, त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स अजूनही नेटकरी फॉलो करत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटातील गाण्यावर रिल्स केले आहेत. यात अलिकडेच बिग बॉस मराठीच्या दोन स्पर्धकांनीही बोल्ड डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त टीव्ही शो म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिलं जातं. या शोचं आतापर्यंत प्रत्येक पर्व गाजलं आहे. यामधीलच माधव देवचके आणि हिना पांचाळ या जोडीने o antava या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांचा अशा पद्धतीचा डान्स पाहायला मिळाला.
दरम्यान, माधव देवचके आणि हिना पांचाळ यांनी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते. हा शो संपल्यानंतरही घरातील सगळ्या स्पर्धकांची चांगली मैत्री टिकून आहे. अनेकदा ही कलाकार मंडळी एकत्र गेट टू गेदरही करत असतात.