Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रूपाली या देवस्थळी झाली नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 05:16 PM2019-08-09T17:16:38+5:302019-08-09T17:17:08+5:30

बिग बॉसच्या घरातून नुकतीच रुपाली भोसले बाहेर पडली आहे.

Bigg Boss Marathi 2: After leaving Bigg Boss's house, Rupali bowed to this place | Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रूपाली या देवस्थळी झाली नतमस्तक

Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रूपाली या देवस्थळी झाली नतमस्तक

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. घरातील सदस्यांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. त्यात बिग बॉसच्या घरातून नुकतीच रुपाली भोसले बाहेर पडली आहे. रुपाली या शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. तिने यावेळीचे फोटो सोशल मी़डियावर शेअर केले आहेत. 

रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, ज्यांनी मला मार्ग दाखवला त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच पूर्ण होणार नाही. मला भविष्यात आणखीन गोष्टींसाठी ताकद मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर रूपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर एव्ही दाखविली... एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले. रूपाली म्हणाली मी हे ठरवले होते की मी तुला वाचवेन जेव्हा मी इथे उभे असेन...

रुपालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर तिचे लग्न लंडनस्थित एका व्यक्तीसोबत झालेले होते. त्याचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. तो आयटी क्षेत्रात काम करणारा असून लग्नाच्या काहीच वर्षांनंतर रुपाली भारतात परतली. 

सुरेखा यांच्याशी गप्पा मारताना रुपालीने सांगितले होते की, माझ्या आई वडिलांना सांभाळेल असाच जोडीदार मला हवा आहे. माझे आई-वडील ही माझी प्रायोरिटी आहे. माझ्या भावाने त्यांना सांभाळावे असे मला कधीच वाटत नाही. माझे लग्न झाल्यानंतर मी काही वर्षं लंडनला होते. पण माझ्यासाठी हा अनुभव अतिशय वाईट होता. मी सात वर्षं खूप काही सहन केले आहे. मी नेहमीच कुटुंब आणि घर सांभाळणारी आहे. पण तरीही मला माझ्या नात्यात सुख मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा कोणत्याही नात्यात पडताना मी अनेकवेळा विचार करेन. तसेच माझ्या जवळच्या अनेक मैत्रिणींची लग्न होऊन ती तुटलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे मला लग्नाची भीती वाटते. मी पुन्हा कोणत्या नात्यात अडकेल का याविषयी मला देखील माहीत नाहीये. 

Web Title: Bigg Boss Marathi 2: After leaving Bigg Boss's house, Rupali bowed to this place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.