बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात हा होणार फेरबदल, विद्याधर जोशी बनणार सुरेखा पुणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:26 PM2019-05-29T15:26:07+5:302019-05-29T15:52:08+5:30

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन टास्क, वाद–विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टिंग टास्क दिले आहेत.

Bigg boss marathi 2 : This intrsting task will happen in big boss house | बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात हा होणार फेरबदल, विद्याधर जोशी बनणार सुरेखा पुणेकर

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात हा होणार फेरबदल, विद्याधर जोशी बनणार सुरेखा पुणेकर

googlenewsNext
ठळक मुद्देसुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहेअभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टींग टास्क दिले आहेत. सदस्यांमध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगत आहे. सुरेखा पुणेकर – विद्याधर जोशी, किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हानं देणार आहेत. बिग बॉस नेहेमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतात, हे आव्हानं देखील तितकच वेगळ आणि कठीण असणार आहे.

विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे...हे बघायला गंमत येणार हे नक्की.

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विध्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताईं विद्याधर यांना या रावजी ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला अशीही बनवा बनवी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत... अभिजित केळकर मुलीची लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं होईल यात शंका नाही...

Web Title: Bigg boss marathi 2 : This intrsting task will happen in big boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.