बिग बॉस मराठी २ : माधव सांगतोय पडद्यावर स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 19:20 IST2019-07-19T19:19:37+5:302019-07-19T19:20:46+5:30
माधवने पडद्यावर स्त्री व्यक्तिरेखा साकारण्याविषयीचा आपला अनुभव सांगितला.

बिग बॉस मराठी २ : माधव सांगतोय पडद्यावर स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव
कलाकारांचे आयुष्य हे काही सोपे नसते, कारण ते पडद्यावर बरीच पात्रं जिवंत करत असतात आणि दर्शकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात. कामाप्रती दृढनिश्चयाचे असेच एक उदाहरण आपल्याला बिग बॉसमध्ये दिसून आले, जेव्हा माधवने पडद्यावर स्त्री व्यक्तिरेखा साकारण्याविषयीचा आपला अनुभव सांगितला. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये माधव लक्ष्यमधील आपल्या भूमिकेकरिता शॉर्ट ड्रेस व हाय हील्स घालण्याचा आपला बाका प्रसंग सांगत आहे.
आपला अनुभव सांगताना माधव म्हणतो, ''लक्ष्यचा एक एपिसोड होता ज्यामध्ये लेडी बनून मी सगळ्या पोलिस वाल्यांचे खून करतो. त्यात ड्रेस घातला होता मी, लाल रंगाचा, आमिर खानने घातलेल्या एका गाण्यात तसा रेड अँड ब्लॅक आणि बहिणीची हील्स घेऊन गेलो होतो'' आणि तो शिवानीच्या हाय हील्सची उंची दाखवतो.
शिवानी आश्चर्याने बघते, पण माधव आपला अनुभव सांगणे सुरुच ठेवतो, ''बुल्लर गार्डनला शूटिंग करत होतो. तिथे जो बंगलो आहे ना त्याच्या बाहेर गार्डन आहे तिथे स्लोप आहे. तिथेच शॉट लावला, रिहर्सल्स होती त्यांनी मार्क दिला, टायमिंग दिला आणि त्यात मी गॉगल्स लावले होते आणि विग होती साधना हेअर कट वाली.''
''असिस्टंट डायरेक्टर आला रिहर्सल्स झाली आणि जेव्हा टेकच्या वेळी हील्स घातली तेव्हा जमलंच नाही. चालायचे वांदे झाले. मग परत एक रिहर्सल केली हील्समध्ये आणि बॅलन्सिंग जमतंच नव्हतं त्यात मला. मग त्याने सांगितलं कसंतरी एक मास्टर दे मग पुढे आपण बघू.'' अनुभव सांगताना माधव खूपच उत्साहित दिसत होता. यावर शिवानी हसू लागते. पण तो पुढे विस्तृतपणे आपला अनुभव सांगणे सुरुच ठेवतो.