बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरातील या व्यक्तीचे सोशल मीडियावर आहेत सर्वाधिक फॉलोवर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 02:19 PM2019-06-17T14:19:36+5:302019-06-17T14:20:00+5:30
टास्क दिवसेंदिवस आणखी रोचक होत चालले असल्याने घरातल्या सदस्यांना दरदिवशी परस्परांबद्दल नवनवी माहिती मिळते आहे.
राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली विणा जगताप आता बिग बॉस मराठी सीजन २ मधून आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील सदस्यांबरोबरचा तिचा वावर असो वा टास्क दरम्यान तिने केलेली मस्ती असो, तिचे चाहते तिला सतत प्रोत्साहित करताना दिसून येतात.
तिचा मनमोकळा आणि स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडत असून, बिग बॉस मराठी सीजन २ मधील तिच्यासोबत घरात असलेल्या स्पर्धकांच्या तुलनेत 'वीणा' चे सोशल नेटवर्किंग वरील फॉलोअर्स कमालीचे वाढत असलेले आपल्याला पहायला मिळते आहे. कारण, इन्स्टाग्रामवरील तिच्या खाजगी अकाउंटवर १ लाख ५१ हजार फॉलोअर्स दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे या आकड्यांच्या आसपास बिग बाॅस मराठी सीजन २ चा एकही सदस्य आतापर्यंत पोहोचू शकलेला नाही.
आज होणाऱ्या टास्कमध्ये ती कोणती भूमिका घेईल, होणाऱ्या वाद – विवादांना कसं उत्तर देईल ? हे कळेलच... कारण, बिग बॉसच घर प्रत्येक सदस्याला प्रत्येक दिवशी येणाऱ्या संकंटाना कसं सामोर जावं हे शिकवत असत. नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीतून नेहा खाली पडली... नेहाने वेळोवेळी शिवला थांबायला सांगितले परंतु नेहाचे शिवने ऐकले नाही... टास्क दरम्यान अशा गोष्टी होताना बऱ्याचदा पाहायला मिळतात. परंतु याच टास्क दरम्यान घरामध्ये शिव आणि पराग मध्ये वाद होताना दिसणार आहे...
परागला ही गोष्ट पटली नाही आणि त्यामुळे ती त्याने शिवला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद रंगला. परागचे म्हणणे होते, नेहा पडली आणि ती त्याचा मोठा issue करू शकते आणि ते शिववर शेकेल आणि हे तो त्यांच्या टीमला देखील सांगत होता. तर शिवने परागला शांत बसायला सांगितले आणि शिवचे हेच वागणे आणि बोलणे परागला पटले नाही... परागने शिवला सांगितले मी तुला चांगला सल्ला देतो आहे, पण मला शिकवू नकोस असे शिवचे म्हणणे... मी नेहाची माफी मागितले आहे आणि शनि – रविच्या भागामध्ये काय होईल त्याला मी समोर जाईन, मी बघेन काय करायचं... शिवला पराग म्हणाला पुढच्या वेळेस अस वागताना विचार कर, शिवच म्हणण होत मी कृती केल्यावर विचार करत नाही, त्यावर परागने सांगितले मग आम्हांला विचार करावा लागेल... असे बोलल्याने शिवने सांगितले “मला धमकी देऊ नकोस... आता वाद कुठवर गेला हे आज बघायला मिळेल.