Bigg Boss Marathi 2 : बिग बॉस मराठी 2 मधील ही सदस्य आहे मेघा धाडेची बेस्ट फ्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:38 IST2019-08-08T18:37:48+5:302019-08-08T18:38:57+5:30
वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये मेघा धाडेबाबत चर्चा सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉस मराठी 2 मधील ही सदस्य आहे मेघा धाडेची बेस्ट फ्रेंड
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला भव्य यश मिळाले. मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. आता दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये शिव, वीणा आणि शिवानी बिग बॉस मराठी 1 ची विजेती मेघा धाडेबाबत चर्चा करताना दिसत आहेत. शिवानी मेघासोबतच्या आपल्या मैत्रीबाबत सांगत आहे.
''तू मेघाला कसं ओळखतेस?'' असा प्रश्न शिवानीने विचारल्यानंतर वीणाने सांगितले की, ''मी तिला मेसेज केलेला इथे येण्याआधी. आता ओळखते मी तिला आणि मी लास्ट इअर आलेली ना गेस्ट म्हणून शोमध्ये बीबी टास्कच्या वेळी तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. मी बिग बॉसच्या घरात येण्याआधी मी येथे येऊ की नको हे तिला विचारलं होतं... मी काय करू, प्लीज सजेस्ट करशील का असे तिला विचारल्यावर ती म्हणाली होती, तुला काय वाटतं, मी बोलले खूप जावंसं वाटतंय, ती म्हणाली बिंदास जा!''
शिवानी आणि वीणाचे बोलणे सुरू असताना शिव येऊन शिवानीला विचारतो की, ''मेघा तुझी बेस्टी आहे?'' याबाबत शिवानी मान हलवत म्हणते, ''मी तिच्या घरीच असते हाफ ऑफ द टाइम, मालाडला. ती पूर्वी चेंबूरला राहायची तेव्हा तर मी सतत तिच्याच घरी असायचे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिचा अपघात झाला, तो काळ तिच्यासाठी खूप वाईट होता. त्या काळात देखील मी तिच्यासोबतच होते. मेघाच्या दोन्ही पायांमध्ये रॉड आहेत. ती आणि तिचा नवरा कुठेतरी बाहेर गेले होते आणि तिने हिल्स घातले होते आणि चालता चालता ती पडली. त्यावेळी तिच्या हाडांना दुखापत झाली आणि त्यामुळे तिच्या पायात रॉड टाकावे लागले.''
शिवानी त्यानंतर मेघाच्या आयुष्याबाबत शेअर करते, ''मेघाने २०१४ मध्ये लग्न केले. आता मेघाइतकाच तिचा नवरा देखील माझा चांगला मित्र आहे. तिच्या नवऱ्याचे नाव आदित्य आहे. मराठीच आहे तो, मुळचा रत्नागिरीचा आहे. तो एका आयटी कंपनीत काम करतो.''