Bigg boss Marathi 2: सुरेखा पुणेकर सांगतायेत, बिग बॉसच्या घरात कोणी नादी लागलं तर धडा शिकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:06 IST2019-05-26T23:50:00+5:302019-05-27T00:06:10+5:30

सुरेखा पुणेकर यांनी लावणी या कलेला भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील एक प्रतिष्ठा मिळवून दिली.

Bigg Boss Marathi 2 : Surekha Punekar in Bigg Boss Marathi 2 | Bigg boss Marathi 2: सुरेखा पुणेकर सांगतायेत, बिग बॉसच्या घरात कोणी नादी लागलं तर धडा शिकवणार

Bigg boss Marathi 2: सुरेखा पुणेकर सांगतायेत, बिग बॉसच्या घरात कोणी नादी लागलं तर धडा शिकवणार

ठळक मुद्देहा गेम खूप छान पैकी खेळायचा असे मी ठरवले आहे. कोणी माझ्या नादी लागले तर त्याला मी धडा नक्कीच शिकवणार आहे. तिथे आनंदाने राहायचे, जेवण बनवायचे हे मी ठरवले आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांना आपल्याला यात पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर यांनी एंट्री घेतली असून त्या या कार्यक्रमाच्या स्पर्धक आहेत. 

सुरेखा पुणेकर यांनी लावणी या कलेला भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या आता बिग बॉसच्या घरात गेल्या असून त्यांनी या कार्यक्रमात जाण्यापूर्वी आमच्याशी गप्पा मारल्या होत्या. बिग बॉस आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे घरात जाताना आता तुमच्या मनात काय सुरू आहे. याविषयी विचारले असता त्या सांगतात, हा गेम खूप छान पैकी खेळायचा असे मी ठरवले आहे. कोणी माझ्या नादी लागले तर त्याला मी धडा नक्कीच शिकवणार आहे. तिथे आनंदाने राहायचे, जेवण बनवायचे हे मी ठरवले आहे. मी खूप चांगले जेवण बनवते. पण मी माझ्या कामांमध्ये व्यग्र असल्याने मला किचनमध्ये जास्त वेळ घालवता येत नाही. पण आता मी तिथे चमचमीत जेवण बनवणार आहे. मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सगळ्यात जास्त माझ्या नातवांना आणि मुलांना मिस करणार आहे. त्यांना देखील माझी खूप आठवण येणार यात काहीच शंका नाही. 

बिग बॉसच्या घरात लावणीचा सुर घुमणार का असे विचारले असता त्या सांगतात, माझा रियाज हा बिग बॉसच्या घरात देखील सुरू असणार. त्यामुळे प्रेक्षकांना माझ्या लावण्या नक्कीच पाहायला मिळतील. तसेच मी माझ्या माझी प्रसिद्ध गाणी तिथे गाणार देखील आहे आणि विशेष म्हणजे घरात लोकांना मी खरी कशी आहे हे पाहायला मिळणार आहे. कारण मी नेहमीच नऊवारीमध्ये किंवा सहावारी साडींमध्ये दिसते. तसेच मला मेकशिवाय देखील लोकांनी पाहिलेले नाहीये. पण आता मी एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi 2 : Surekha Punekar in Bigg Boss Marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.