Bigg Boss Marathi 2: वीणानं शेअर केला शिवसोबतचा फोटो, म्हणाली - राधा प्रेम रंगी रंगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:42 IST2019-09-10T14:42:08+5:302019-09-10T14:42:52+5:30
शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचे प्रेम सध्या फुलताना पहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 2: वीणानं शेअर केला शिवसोबतचा फोटो, म्हणाली - राधा प्रेम रंगी रंगली
‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचे प्रेम सध्या फुलताना पहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी २’च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरु झाला. इतकेच नाही तर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. त्यांच्या भेटीचा फोटो शिवनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात आता वीणानं त्या दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
वीणानं शिव व तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शिवच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्यावेळचा आहे. त्या दोघांचा फोटो शेअर करत वीणानं म्हटलं की, राधा प्रेम रंगी रंगली.
शिव ठाकरेचा वाढदिवस अमरावतीमध्ये साजरा केला.
या बर्थडे पार्टीचा व्हिडिओदेखील शिवनं शेअर केला आहे.
यात वीणा व शिव धमालमस्ती करताना दिसणार आहे.
शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.
लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे. आता ते दोघे लग्न करणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.