बिग बॉस मराठी २ : विद्याधर जोशींनी सांगितले का आहेत ते इंडस्ट्रीमध्ये 'बदनाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 07:22 PM2019-05-29T19:22:31+5:302019-05-29T19:23:05+5:30

बिग बॉसच्या घरात अवघे दोन दिवस झालेत आणि आतापासूनच या घरातले स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत.

Bigg Boss Marathi 2: Vidyadhar Joshi said why they are dishonourable in the industry | बिग बॉस मराठी २ : विद्याधर जोशींनी सांगितले का आहेत ते इंडस्ट्रीमध्ये 'बदनाम'

बिग बॉस मराठी २ : विद्याधर जोशींनी सांगितले का आहेत ते इंडस्ट्रीमध्ये 'बदनाम'

googlenewsNext

बिग बॉसच्या घरात अवघे दोन दिवस झालेत आणि आतापासूनच या घरातले स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. वूटवरील 'अनसीन अनदेखा'मधील एका स्टोरीमध्ये आपण पाहू शकतो की, इतर स्पर्धक विद्याधरबद्दल नेमके काय बोलत आहेत आणि तिकडे शिवानी त्याची गंमत करतेय. विद्याधर जोशी काहीसे गोंधळलेले आहेत. तरुण स्पर्धकांना त्यांनी विचारले की, वेब सीरिजमध्ये लोकांना काम नेमके कसे मिळतं? यावर शिवानीने त्यांना चिडवत म्हटले, "ते पण टेकओव्हर करायचे आहे का?" त्यावर विद्याधर यांनी चटकन प्रत्युत्तर दिले, "मी इथे आलोय म्हणजे माझ्याकडे काम नाही, हे सिद्ध होते की नाही!"

या सगळ्या गमतीत दिगंबर नाईक व इतरही सामील झाले आणि ते म्‍हणाले की, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच विद्याधर यांनी पुढील सिनेमे व मालिका साइन केल्‍या असतील. यावर विद्याधर म्हणाले, "मला जर ते तीन महिने अॅडजस्ट करायला तयार असतील तर तो किती थुकरट रोल असेल." 


मात्र खरा आश्चर्याचा धक्का नंतर होता, जेव्हा शिवानी त्यांना उद्देशून म्हणाली की "बाप्पा सेट वरच येतो तर 'माझ्याकडे ४ तासच आहेत लवकर काय ते करून घ्या'." या वाक्यामुळे विद्याधर यांनी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी एक किस्सा सांगितला आणि म्हणाले, "तुला माहिती आहे का, यावरून माझी खूप बदनामी झाली आहे..." ते पुढे म्हणाले, "मी नाव नाही घेत पण आपल्यातीलच चांगले निर्माती मला एकदा म्हणाली की बाप्पांची कम्प्लेंट आहे की तू वेळ देत नाही पुरेसा." त्यावर विद्याधर जोशीने निर्मातीला सांगितले की, इतक्या प्रामाणिकपणे काम करतो तर तुला असे का सांगतात इतर लोक.  

विद्याधरच्या या उत्तरानंतर त्या प्रोड्युसरला तिचे उत्तर मिळाले असेल अशी आशा आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Vidyadhar Joshi said why they are dishonourable in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.