Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकलेला का आला इतका राग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 19:38 IST2019-08-23T19:36:34+5:302019-08-23T19:38:25+5:30
बिग बॉसच्या घरात आज बिचुकले आणि घरातील एका सदस्यामध्ये वाद होणार आहे.

Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकलेला का आला इतका राग?
बिग बॉस मराठी 2 चा फिनाले जवळ आला असून आता काहीच दिवसांत या कार्यक्रमाचा विजेता ठरणार आहे. आपलाच आवडता स्पर्धक विजेता ठरावा यासाठी सध्या सगळ्या स्पर्धकांचे फॅन्स प्रयत्न करत आहे. शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या दोघींनी तर फिनालेमध्ये धडक मारली असून आता आणखी कोणते तीन स्पर्धक फिनालेत पोहोचणार याची सगळे वाट पाहात आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात आज बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे... ज्यासाठी सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे आणि याच मुद्यावरून सदस्यांमध्ये आज वाद होणार आहेत... बिचुकले आज नेहावर चिडणार आहेत... त्यांचे म्हणणे आहे की, मी केलेली सजावट तू का काढून टाकलीस? त्यावर आरोह त्यांना म्हणणार आहे की, तुम्ही आत जाऊन बघा कुठलं चांगल दिसत आहे... आधीचे की आताचे? त्यावर बिचुकले त्याला म्हणणार आहेत की, आम्ही करू ते चांगल नसतंच का? यावर वीणा बोलणार आहे की, “आमच्या पण काही भावना असतात. मी नेहाला म्हणाले होते की, ती सजावट तशीच राहू दे... पण तिने काढली सजावट... माझं इतकंच म्हणणं आहे की, प्रत्येकाने जे काम केले आहे ते असू द्यायला हवं. त्यावर नेहा म्हणणार आहे की, ते चांगले दिसत नव्हते. त्यावर वीणा नेहाला लगेचच प्रत्युत्तर देणार आहे. ती म्हणाणार आहे की, इतकं पण घाण दिसत नव्हतं. किशोरी शहाणे देखील बिचुकलेची बाजू घेत म्हणणार आहेत की, ते काढल्यामुळे ज्यांनी ते केले होते त्यांच्या भावना दुखावल्या आहेत... त्यावर वीणा आरोहला सांगणार आहे की, प्रत्येकाला जे करायचे आहे ते करू दे... त्यावर शेवटी अभिजीत बिचुकले म्हणणार आहे की, “आम्ही बाजूला थांबलो असतो... तुम्ही करत असताना आम्ही फक्त बघत राहिलो असतो”...
या सगळ्यावर नेहा माफी मागणार आहे. पण आता हा वाद किती पुढे जाणार? खरंच हा वादाचा मुद्दा होता का? नक्की काय झाले? हे प्रेक्षकांना आजच्या बिग बॉस मराठी 2 च्या भागात पाहायला मिळणार आहे.