Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरेच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:00 PM2019-09-02T18:00:00+5:302019-09-02T18:00:02+5:30

शिवच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर आपल्याला त्याच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात.

Bigg Boss Marathi 2 Winner: Have you seen photos of Shiv Thackeray's family? | Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरेच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरेच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
ठळक मुद्देशिवचे त्याच्या आई-वडीलांवर आणि मोठ्या बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. काल विजेता ठरल्यानंतर देखील सगळ्यात पहिल्यांदा त्याने त्याच्या बहिणीशी आणि आईशी गळाभेट घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 

बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमाचे विजेतेपद शिव ठाकरेला मिळाले असून त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख मिळाले आहेत. शिव हाच कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिव हा मुळचा विदर्भाचा असून त्याचे संपूर्ण कुटुंब हे तिथेच राहाते. तो आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहातो. त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर आपल्याला त्याच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात.

शिवचे त्याच्या आई-वडीलांवर आणि मोठ्या बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. काल विजेता ठरल्यानंतर देखील सगळ्यात पहिल्यांदा त्याने त्याच्या बहिणीशी आणि आईशी गळाभेट घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 

 


शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. या कार्यक्रमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. पण खऱ्या अर्थाने लोकप्रियता त्याला बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे मिळाली. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे.

शिवने त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांविषयी बिग बॉसच्या घरात सांगितले होते. शीव त्याच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देताना म्‍हणाला होता, ''आमचं घर कौलाचं होतं... अतिशय छोटे असले तरी ते माझ्यासाठी खूपच सुंदर होते... पण पावसाळ्यात कौलातून पाणी गळायचं... आई अक्षरशः पाऊस पडल्यावर मी भिजू नये यासाठी भांडं पकडून बसून राहायची. मला माझ्या घराची ही परिस्थिती पाहावत नव्हती. त्यामुळे मी सकाळी भल्या पहाटे दूध आणि वर्तमानपत्र घरोघरी टाकायचे काम करू लागतो.

तसेच दिवाळीत फटाक्‍याचे दुकान लावायचो. फटाक्यांची चांगली विक्री व्हायची आणि त्यातून चांगले पैसे मिळायचे... त्‍यातले काही आईला द्यायचो... उरलेल्या पैशांचे कपडे घ्‍यायचो. नंतर मग मी डान्‍स बघून बघून शिकलो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करायला लागलो. मला शाळेत वगैरे शिकवायला बोलवायचे... त्‍याचे सुरुवातीला ७५ रुपये भेटायचे. मग हळूहळू ५००, १०००, ५०००, १०,००० मिळायला लागले. काही काळानंतर तर १५ दिवसांत मला ७५,००० रुपयांहून अधिक रक्कम मिळायला लागली. लोकांना माझं टिचिंग आवडू लागले. त्याचकाळात मी इंजिनिअरिंगला देखील प्रवेश घेतला. आता मी, ताई आणि आई आम्‍ही तिघांनी मिळून छानसं घर घेतले आहे. पप्‍पांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो.''

Web Title: Bigg Boss Marathi 2 Winner: Have you seen photos of Shiv Thackeray's family?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.