Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरे बनला बिग बॉस मराठी २चा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 10:47 PM2019-09-01T22:47:12+5:302019-09-01T23:56:51+5:30

शिव हाच कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता.

Bigg Boss Marathi 2 Winner: Shiv Thackeray becomes the winner of Big Boss Marathi 2 | Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरे बनला बिग बॉस मराठी २चा विजेता

Bigg Boss Marathi 2 Winner : शिव ठाकरे बनला बिग बॉस मराठी २चा विजेता

googlenewsNext
ठळक मुद्देशीव ठाकरे बिग बॉस मराठी २ चा विजेता ठरला आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख मिळणार आहेत.

बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले आज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात दोन स्पर्धक शिल्लक राहिले होते. आता शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांच्यामधून शिव ठाकरे विजेता ठरला आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख मिळणार आहेत. शिव हाच कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता.

शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. बिग बॉस मराठीमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे. शिवने त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांविषयी बिग बॉसच्या घरात सांगितले होते. शिव त्याच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देताना म्‍हणाला होता, ''आमचं घर कौलाचं होतं... अतिशय छोटे असले तरी ते माझ्यासाठी खूपच सुंदर होते... पण पावसाळ्यात कौलातून पाणी गळायचं... आई अक्षरशः पाऊस पडल्यावर मी भिजू नये यासाठी भांडं पकडून बसून राहायची. मला माझ्या घराची ही परिस्थिती पाहावत नव्हती. त्यामुळे मी सकाळी भल्या पहाटे दूध आणि वर्तमानपत्र घरोघरी टाकायचे काम करू लागतो. तसेच दिवाळीत फटाक्‍याचे दुकान लावायचो. फटाक्यांची चांगली विक्री व्हायची आणि त्यातून चांगले पैसे मिळायचे... त्‍यातले काही आईला द्यायचो... उरलेल्या पैशांचे कपडे घ्‍यायचो. नंतर मग मी डान्‍स बघून बघून शिकलो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करायला लागलो. मला शाळेत वगैरे शिकवायला बोलवायचे... त्‍याचे सुरुवातीला ७५ रुपये भेटायचे. मग हळूहळू ५००, १०००, ५०००, १०,००० मिळायला लागले. काही काळानंतर तर १५ दिवसांत मला ७५,००० रुपयांहून अधिक रक्कम मिळायला लागली. लोकांना माझं टिचिंग आवडू लागले. त्याचकाळात मी इंजिनिअरिंगला देखील प्रवेश घेतला. आता मी, ताई आणि आई आम्‍ही तिघांनी मिळून छानसं घर घेतले आहे. पप्‍पांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो.''


बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ते या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.  




 

Web Title: Bigg Boss Marathi 2 Winner: Shiv Thackeray becomes the winner of Big Boss Marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.