थोडक्यात बचावला ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे, अमरावतीजवळ कारला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 10:04 AM2021-11-21T10:04:07+5:302021-11-21T10:05:00+5:30

Shiv Thakare car accident: शिव ठाकरे अमरावती वरून अचलपूर कडे निघाला होता. यादरम्यान वळगावच्या  त्याच्या कारला मागून टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली.

Bigg Boss Marathi 2 winner Shiv Thakare survives car accident | थोडक्यात बचावला ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे, अमरावतीजवळ कारला अपघात

थोडक्यात बचावला ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे, अमरावतीजवळ कारला अपघात

googlenewsNext

बिग बॉस मराठी 2’चा (Bigg Boss Marathi 2) विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) एका अपघातातून थोडक्यात बचावला.  शिव ठाकरे त्याच्या कुटुंबासह प्रवास करत असताना अमरावती जिल्ह्यातील वळगावजवळ त्याच्या कारला अपघात झाला. सुदैवाने, शिव आणि त्याचे कुटुंब सुखरूप आहे. आहेत. या अपघतात शिवच्या चेह-याला गंभीर  दुखापत झाली आहे.
‘मराठी कलाकार विश्व’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. शिव ठाकरे  अमरावती वरून अचलपूर कडे निघाला होता. यादरम्यान वळगावच्या  त्याच्या कारला मागून टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, शिवची कार थेट शेतात कलंडली.  या अपघातात कारचा मागचा भाग चकनाचूर झाला.

शिवच्या चेह-याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या आई व बहिणीला किरकोळ मार लागला आहे. मात्र गाडीचा मागील भाग चकनाचूर झाला आहे. अपघातानंतरचा शिवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   यामध्ये त्याच्या चेह-याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे.

शिव ठाकरे जन्म 9 सप्टेंबर 1989 मध्ये अमरावती येथे झाला आहे. डान्सर असलेला  शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. ‘बिग बॉस मराठी 2’मुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे. शिवने त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांविषयी बिग बॉसच्या घरात सांगितले होते. बिग बॉसच्या घरात त्याच्या व वीणा जगतापची प्रेमकहाणी चांगलीच बहरली होती. अर्थात आताश: दोघांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय.

Web Title: Bigg Boss Marathi 2 winner Shiv Thakare survives car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.