Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकर यांच्या मते हे आहेत बिग बॉसचे टॉप ५ सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:58 IST2021-11-03T13:58:00+5:302021-11-03T13:58:36+5:30
Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकर यांनी यंदाचा सीझन खूप कमाल असल्याचे म्हटले आहे.

Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकर यांच्या मते हे आहेत बिग बॉसचे टॉप ५ सदस्य
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम हा हिंदी चित्रपट येत्या २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे समजते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांना बिग बॉस मराठी ३मधील टॉप ५ स्पर्धक कोण असतील, याबद्दल विचारले असता त्यांनी विशाल, विकास, मीनल, जय आणि बहुतेक उत्कर्ष हे ५ सदस्य बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 3) टॉप ५ पर्यंत बाजी मारू शकतील असे म्हटले.
महेश मांजरेकर म्हणाले की ,माझे टॉप ५ आता तरी कारण पुढे जाऊन ते बदलतील की मला माहित नाही कारण यावेळचा सीझन खूप कमाल आहे पण माझ्या मते विशाल, विकास, मीनल, जय आणि बहुतेक उत्कर्ष हे ५ सदस्य बिग बॉसच्या टॉप ५ पर्यंत बाजी मारू शकतील. उत्कर्ष तसा खूप हुशार आहे पण तो का त्या जयच्या शॅडोमध्ये खेळतो मला माहित नाही, तो त्याचे नुकसान करून घेतो आहे, त्यामुळे काय होते की त्याला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. मला कळत नाही की तो का असे वागतोय तो सगळ्यात हुशार आहे आणि त्याला मी टॉप ५ मध्ये बघतो.
पोरीपण खूप भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात
ते पुढे म्हणाले की, पोरीपण खूप भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. तो विशाल तसा हुशार आहे तो डिपेंड होत नाही कोणावर तो आपापला गेम खेळतो. काही दिवसांपूर्वी खूप चिडचिड झाली पण तो चुकीचा नाही खेळला. अभिनेते महेश मांजरेकर यांनी ५ सदस्यांची संभाव्य टॉप ५ची यादी प्रेक्षकांसमोर जरी मांडली असली तरी वास्तवात मात्र काय घडते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.