Bigg Boss Marathi 3: '...खरंतर तुम्ही राक्षस आहात', असं गायत्री दातार का म्हणाली तृप्ती देसाईंना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:35 PM2021-10-26T12:35:53+5:302021-10-26T12:36:23+5:30

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 3: '... Actually you are a monster', why did Gayatri Datar say to Trupti Desai? | Bigg Boss Marathi 3: '...खरंतर तुम्ही राक्षस आहात', असं गायत्री दातार का म्हणाली तृप्ती देसाईंना?

Bigg Boss Marathi 3: '...खरंतर तुम्ही राक्षस आहात', असं गायत्री दातार का म्हणाली तृप्ती देसाईंना?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन खूप चर्चेत आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये सतत भांडणं, बाचाबाची आणि टास्कदरम्यान राडे पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर घरात दोन गटही पडलेले पहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे. या कार्यामध्ये कोणाचा संयम तुटणार ? कोण संयमाला धरून चालणार ? आजच्या भागामध्ये कळेलच. आज टास्क दरम्यान गायत्री आणि विकास तृप्तीताईंना खडेबोल ऐकवताना दिसणार आहेत.

गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही येत करता... नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं. सगळं पक्षपाती करायचे. तृप्तीताई म्हणाल्या “मला बांधू द्या... तुम्ही म्हणाल तसं” गायत्री म्हणाली, आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर. एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत ? बांधता पण येत नाही नीट हो ना ? विकास आणि गायत्री बोलताना दिसणार आहे फक्त खोट बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना ?
आता विकास आणि गायत्रीच्या या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तरे देतील हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी ३चा आजचा भाग पहावा लागेल. 
 

Web Title: Bigg Boss Marathi 3: '... Actually you are a monster', why did Gayatri Datar say to Trupti Desai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.