Bigg Boss Marathi 3:विकास आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, नेमकं त्यांचे कशावरून बिनसले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:42 PM2021-12-06T18:42:16+5:302021-12-06T18:55:19+5:30

बिग बॉस मराठीच्या सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं ...

Bigg Boss Marathi 3: clashes between Sonali and Vikas in bbh3 | Bigg Boss Marathi 3:विकास आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, नेमकं त्यांचे कशावरून बिनसले?

Bigg Boss Marathi 3:विकास आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, नेमकं त्यांचे कशावरून बिनसले?

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं झाले विकास आणि सोनालीमध्ये... एका मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये कळेलच.

 
विकासचे म्हणणे आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी पण बोले होते. बाकी काही असलं तरी एकमेकांना लॉयल तरी आहेत.लॉयलटी आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली त्यावर म्हणाली, लॉयलटीच्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं, लॉयलटीन दाखवणं हा विषय येतंच नाही. संभाषण सुरू असताना सोनालीने विकासला खडसावून सांगितले तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन विरोधाभासी विधान केलेस ना आता... सोनालीचे म्हणणे आहे ते महत्वाचे नाही आता मी बोलते महत्वाचे ते आहे. कुठेनाकुठे तू अविश्वास दाखवतो आहेस... आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली.

आता हा शो अंतिम टप्प्यात आहे. साहजिकच बिग बॉस मराठी 3 चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी प्रेक्षकांना 26 डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय, ‘टाइम ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 26 डिसेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले होणार आहे. सध्या ग्रँड फिनालेची जोरदार तयारी सुरू असल्याचं कळतंय.

Web Title: Bigg Boss Marathi 3: clashes between Sonali and Vikas in bbh3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.