रणसंग्रामाला सुरुवात! पहिल्याच आठवड्यात सुरेखा कुडचीने मिळवला किचनवर ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:02 IST2021-09-20T17:01:22+5:302021-09-20T17:02:29+5:30
Bigg boss marathi 3: पडद्यावर खाष्ट सासूची भूमिका साकारणाऱ्या सुरेखाने तिच्यातील हुकमीपणा सुरु केला आहे.

रणसंग्रामाला सुरुवात! पहिल्याच आठवड्यात सुरेखा कुडचीने मिळवला किचनवर ताबा
ठसकेबाज लावणी सादर करत 'बिग बॉस मराठी ३'मध्ये मोठ्या दणक्यात एण्ट्री करणारी अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सुरेखा आता बिग बॉस ३ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे पडद्यावर खाष्ट सासूची भूमिका साकारणाऱ्या सुरेखाने तिच्यातील हुकमीपणा सुरु केला आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सुरेखाने किचनचा ताबा मिळवला आहे.
नुकताच कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी ३'चा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. यावेळी महेश मांजरेकरांनी स्पर्धकांना घरात प्रवेश देण्यापूर्वीच काही जबाबदाऱ्या वाटून दिल्या. यात पहिल्या आठवड्यात घरातील सगळ्या स्त्रियांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. सोबतच त्यांच्या हाताखाली काम करायला सेवकही दिले आहेत. त्यामुळे पहिल्या आठवड्यात या घरात महिला राज पाहायला मिळणार आहे.
पहिल्या आठवड्यात सुरेखा कुडचीवर किचनची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता आविष्कार दारव्हेकर आणि संतोष चौधरी हे तिचे सेवक असणार आहेत. त्यामुळे किचनवर ताबा मिळवण्यास सुरेखा यशस्वी ठरली आहे. पण, सुरेखा केवळ सकाळाच्या वेळात किचनची जबाबदारी सांभाळेल. त्यानंतर संध्याकाळी स्नेहा वाघ स्वयंपाक घराची जबाबदारी घेणार असून जय दुधाणे व विशाल निकम तिचे सेवक असतील.
दरम्यान, सुरेखा कुडची प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. १९९७ मध्ये सुरेखाने कलाविश्वात पदार्पण केलं.'अशी असावी सासू', 'भरत आला परत', 'तुच माझी राणी', 'सासुची माया', 'खुर्ची सम्राट', 'तीन बायका फजिती ऐका', 'फॉरेनची पाटलीन' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.