Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'डान्स पे चान्स' कॅप्टन्सी कार्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:21 IST2021-10-08T17:21:15+5:302021-10-08T17:21:30+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे डान्स पे चान्स हे कॅप्टन्सी कार्य.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'डान्स पे चान्स' कॅप्टन्सी कार्य !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे डान्स पे चान्स हे कॅप्टन्सी कार्य. पुढील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागामध्ये कळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकसे बडकर एक असे गेटअप केले आहेत.
सुरेखा कुडची-अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस)-आविष्कार दारव्हेकर, मीनल शाह–गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे - सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ – तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ – विकास पाटील या जोड्या असणार आहेत. आता यांनी कोणत्या गाण्यांवर डान्स केला, कोण बनला घराचा नवा कॅप्टन कळणार आहे आज. दादुस आणि आविष्कार यांनी पार्टनर चित्रपटातल्या गाण्यावर धम्माल डान्स केला. आविष्कार आणि दादूस बनले बिग बॉस मराठीच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा. घरातील सदस्यांनी बघूया अजून काय काय धमाल केली.
याचसोबत टीम A मधील सदस्यांची चर्चा बघायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्कसाठीच्या उमेदवारीसाठी. ज्यामध्ये जय त्याचा मुद्दा मांडताना दिसणार आहे, “आपण जर असे वाद करणार असू तर आपण जे आता म्हणतो आहे की मी समजूतदार वगैरे तर आपण बाहेरच्या सहा जणांना कसे सांभाळणार ? बिग बॉस मराठी सीझन तिसरा दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पहा.