आला काय नि गेला काय! ‘Bigg Boss Marathi 3’मधून आदिश वैद्य ‘आऊट’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:21 AM2021-10-25T10:21:36+5:302021-10-25T10:22:43+5:30
Bigg Boss Marathi Season 3 Elimination: ‘बिग बॉस मराठी 3’मधील एका सदस्याचा प्रवास काल संपला. होय, मोठ्या दणक्यात वाईल्ड कार्डद्वारे त्याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. पण तो आला काय नि गेला, हे कळलंच नाही.
‘बिग बॉस मराठी 3’मधील (Bigg Boss Marathi 3 ) एका सदस्याचा प्रवास काल संपला. होय, मोठ्या दणक्यात वाईल्ड कार्डद्वारे त्याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. पण तो आला काय नि गेला, हे कळलंच नाही. फॉर्ममध्ये येण्याआधीच तो बिग बॉसमधून बाद झाला. आम्ही कोणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. होय, आम्ही बोलतोय ते आदिश वैद्यबद्दल (Adish Vaidya).
आदिश हा बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणारा पहिला सदस्य (Wild Card Contestant Adish Vaidya )होता. तो आल्याने घरातील अख्खी समीकरणं बदलतील, असा अंदाज होता. पण गेल्या आठवड्यात आदिश, मीनल शहा, विकास पाटील व संतोष चौधरी उर्फ दादूस हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार, आदिशचा बिग बॉस मराठीच्या या पर्वातील प्रवास संपुष्टात आला.
आदिशने ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही तो दिसला होता. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेला आदिश अदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
काल रविवारी ‘बिग बॉस मराठी 3’च्या चावडीवर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि रेशम टिपणीस या दोघींनी हजेरी लावली होती. यावेळी मेघा व रेशम या दोघींनी घरातील सदस्यांचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या चुकांवरही नेमकं बोट ठेवलं. त्याआधी शनिवारी रंगलेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्वच सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. मला तुमच्यासोबत काहीही बोलायचं नाही, अशी सुरूवात करत त्यांनी सर्वांना झाप झाप झापलं होतं. आता त्यांच्या या शाब्दिक फटक्यांचा बिग बॉस मराठीच्या सदस्यांवर काय परिणाम होतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाय या आठवड्यात घरातील कॅप्शन कोण होतो, घरातील टास्क कसे रंगतात, हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे.