Bigg Boss Marathi 3, Episodes,12 Nov : 'माझं प्रेम असंच आहे'; स्नेहासमोर विशालने दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:33 PM2021-11-12T14:33:46+5:302021-11-12T14:34:20+5:30
Bigg Boss Marathi 3: या घरात दररोज नाती बदलतांना दिसतात. यामध्येच आता विशाल (vishal), स्नेहासमोर (sneha) त्याच्या मनातील भाव व्यक्त करणार आहे.
बिग बॉसच्या (bigg boss marathi 3) घरात कधी कोणतं नातं कोणत्या वळणावर बदलेलं याचा काहीच नेम नाही. शो सुरु झाल्यानंतर एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असलेल्या अनेकांच्या नात्यात फूट पडली आहे. त्यामुळे या घरात दररोज नाती बदलतांना दिसतात. यामध्येच आता विशाल (vishal), स्नेहासमोर (sneha) त्याच्या मनातील भाव व्यक्त करणार आहे. परंतु, हे केवळ टास्क पुरतं मर्यादित आहे की खरंच त्याला मनापासून वाटतंय हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल आणि स्नेहा घरात रंगत असलेल्या कॅप्टन्सी टास्कविषयी बोलत आहेत. सोबतच स्नेहाचं मत मिळावं यासाठी विशाल कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे.
सध्या घरात विशाल आणि जय यांच्यात कॅप्टन्सी कार्य रंगत आहेत. यामध्ये . उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि दादूस यांनी जयला समर्थन दिलं आहे. तर मीनल, विकास, सोनाली आणि नीथा हे विशालला पाठिंबा देत आहेत. या सगळ्यांमध्ये स्नेहाचं मत मिळवणं जय आणि विशालसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तिचं मन वळवण्यासाठी आणि तिचं मत मिळवण्यासाठी दोघंही प्रयत्न करत आहेत. यामध्येच विशाल त्याचा मनातील गोष्ट थेट स्नेहाला सांगतो.
" स्नेहा मी मानतो ते इथून मनातून मानतो. आधी सुद्धी मी तुमच्यासोबत होतो आणि यापुढेदेखील कायम राहीन. माझं प्रेम असंच आहे", असं विशाल म्हणतो. दरम्यान, विशालने ज्या पद्धतीने स्नेहाचं मनं वळवलं आहे ते पाहून "तुम्ही मन जिंकल आहे", असं स्नेहा म्हणते. परंतु, ऐनवेळी ती जय आणि विशाल या दोघांपैकी नेमकं कोणाला मत देते हे आजच्या भागातच प्रेक्षकांना समजणार आहे.