Bigg Boss Marathi 3 Episodes, 14 Oct: बिग बॉसच्या घरात पहिल्या प्रेमाची चर्चा, हा सदस्य देतोय प्रेमाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:30 PM2021-10-14T13:30:22+5:302021-10-14T13:30:47+5:30

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस यांनी सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 14 Oct: Discussion of first love in the house of Bigg Boss, this member is giving love lessons | Bigg Boss Marathi 3 Episodes, 14 Oct: बिग बॉसच्या घरात पहिल्या प्रेमाची चर्चा, हा सदस्य देतोय प्रेमाचे धडे

Bigg Boss Marathi 3 Episodes, 14 Oct: बिग बॉसच्या घरात पहिल्या प्रेमाची चर्चा, हा सदस्य देतोय प्रेमाचे धडे

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “BB College”  जी या आठवड्याची थीम असणार आहे. या BB college मध्ये विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक धाक दाखविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून मज्जा करत त्यांना शिकवताना दिसणार आहेत. बिग बॉस यांनी सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. लक्षवेधी विद्यार्थी ठरण्यासाठी सदस्य प्रयत्न करणार हे निश्चित. जे विद्यार्थी अधिक स्टार मिळवतील ते कॅप्टन पदाचे दोन उमेदवार म्हणून कार्याच्या शेवटी निवडले जातील. 

काल उत्कर्ष, आदिश, दादूस या प्राध्यापकांचे तास भरले. आज सुरेखा कुडची, सोनाली, मीरा यांचे तास भरणार आहेत. स्टार मिळविण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू आहे. बरेच प्लान देखील आखले जात आहेत. काल स्नेहाला दोन तर विशाल निकमला एक स्टार मिळाला. 

काल दादूस यांच्या क्लासमध्ये संगीताची मैफल रंगली, तर आदिशने गायत्रीला हसवले, उत्कर्षने घरातील समीकरणाबद्दल बरेच काही सांगितले. आज सोनाली पाटील BB college मध्ये प्रेमाचे धडे देणार आहे. सोनालीच्या तासात प्रेमाचे वारे वाहणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात जय - स्नेहा, सोनाली - विशाल यांना ससदस्यांकडून खूप चिडवले जाते. तसेच काहीसे आज देखील होणार आहे. सोनाली विद्यार्थ्यांना विचारणार आहे पहिले प्रेम आठवते का ? विकास, आविष्कार मीनल जय सगळेच विशाल - सोनालीला चिडवताना दिसणार आहेत. विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना आणि सदस्यांना आज घायाळ करणार हे नक्की!  

Web Title: Bigg Boss Marathi 3 Episodes, 14 Oct: Discussion of first love in the house of Bigg Boss, this member is giving love lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.