Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Nov: विशाल आणि मीनलमध्ये अबोला... विशाल म्हणतो- 'माझं मनं इतकं मोठं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:54 IST2021-11-15T15:54:03+5:302021-11-15T15:54:28+5:30
Bigg Boss Marathi 3:बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, विशाल आणि मीनलमधील अबोला काही संपायचं नावच घेत नाही.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 15 Nov: विशाल आणि मीनलमध्ये अबोला... विशाल म्हणतो- 'माझं मनं इतकं मोठं नाही'
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशाल कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला.
आज मीनल, विशाल, विकास आणि सोनालीमध्ये यावरूनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली विशालला म्हणाली, सुरुवात तरी करा बोलायला... विशाल म्हणाला पाया पडू तुझ्या... सोनाली म्हणाली, ती पण करेल, तू पण काही मनामध्ये पकडू नकोस. मीनल त्यावर म्हणाली, मला काही नाही बोलायला. त्यावर विशाल म्हणाला, तू मीनल शाह आहे मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठे आहे माझं नाहीये. विकासचे म्हणणे आहे, तू पण जे बोलास ते पण चुकीचे होते... विशाल म्हणाला मी काय चुकीचे बोललो ? विकास आणि सोनाली विशालला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत आणि ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले. विशाल आणि मीनलमधील हा अबोला कधी संपणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा
बिग बॉस मराठी सीझन तिसऱ्याच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडते आहे. त्याला कारणसुद्धा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा... घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिला. त्यामुळे आजच्या भागातच कळेल नेमके काय घडले बिग बॉसच्या घरात.