Bigg Boss Marathi 3,Episodes, 16 Dec: “वटवाघळाला जग उलटचं दिसते” – उत्कर्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:22 PM2021-12-16T14:22:31+5:302021-12-16T14:26:17+5:30
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3) सिझन तिसरा आता अंतिम टप्प्यावर आला आहे.
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3) सिझन तिसरा आता अंतिम टप्प्यावर आला असला तरीदेखील सदस्यांचे रूसवे - फुगवे, भांडण, मतभेद, द्वेष काही संपायचे नावच घेत नाही. घरामध्ये आज सदस्य एकमेकांना आरसा दाखवणार आहेत. त्यांचं कुठे चुकतं आहे, ते कुठे कमी पडत आहेत हे दाखवून देणार आहेत. ते पण एकदम कटू शब्दात. बघूया सदस्य हा सल्ला कसे घेतील की सुरू होईल घरामध्ये अजून एक राडा.
उत्कर्षने आज जयनंतर सोनालीला देखील आरसा दाखवला.त्याचे म्हणणे आहे, मैत्रीण, सखे मी तुला हेच म्हणेन की आपण आरसा पुसत राहतो, आपण चेहरा पुसायचे विसरून जातो. डाग आरशावर नसतात आपल्या स्वत:वर असतात. बर्याच गोष्टी थोडक्यात आता जितक्या कळाल्या आहेत त्या सांगतो मी. सोनाली बर्याचवेळा आपण समोरच्याला ब्लेम करतो, समोरच्याला ऑर्डर देतो, समोरच्याच्या इमोशनशी खेळतो हे बर्याचदा तुझ्याकडून झालेलं आहे. तु चुकीची आहेस की बरोबर आहेस हे बाहेरच्यांनी सांगण्यापेक्षा तुझ्याच ग्रुपमधल्या, तुझ्या मित्रांनी सांगितलं आहे. का बरं तुझीचं भांडण होतात विशाल – मीनल - विकाससोबत ? कारण यामध्ये एक म्हण आहे वटवाघळाला जग उलटचं दिसते. कावीळ झालेल्याला पिवळं दिसतं हे मी तुला आधी देखील म्हंटल होतं. बघूया सोनालीने यावर उत्कर्षला काय उत्तरं दिले आजच्या भागामध्ये.
------