Bigg Boss Marathi 3,Episodes, 19 Dec: उत्कर्ष शिंदे निवडणुकीच्या रिंगणात; निवडणूक चिन्ह जाहीर करत मागितली प्रेक्षकांकडे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:45 IST2021-12-19T14:45:00+5:302021-12-19T14:45:00+5:30
Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉसच्या चावडीवर स्पर्धक प्रेक्षकांकडे मत मागतांना दिसणार आहे. यात उत्कर्षची मत मागायची स्टाइल अनेकांना आवडत आहे.

Bigg Boss Marathi 3,Episodes, 19 Dec: उत्कर्ष शिंदे निवडणुकीच्या रिंगणात; निवडणूक चिन्ह जाहीर करत मागितली प्रेक्षकांकडे मत
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेला जाणार शो म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून घरात केवळ शेवटचे ७ स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. परंतु, हा शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या गेम खेळण्याच्या स्टॅटजीसोबतच प्रेक्षकांचा पाठिंबा असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आज बिग बॉसच्या चावडीवर स्पर्धक प्रेक्षकांकडे मत मागतांना दिसणार आहे. यात उत्कर्षची मत मागायची स्टाइल अनेकांना आवडत आहे.
बिग बॉसच्या चावडीवर आज प्रत्येक स्पर्धकाला प्रेक्षकांकडे मत मागायची आहेत. ही मत मागतांना प्रेक्षकांनी त्यांना मत नेमका का द्यावं? कोणत्या कारणासाठी हे स्पर्धक जिंकावे? हे सारं स्पर्धकांना प्रेक्षकांना पटवून द्यायचं आहे. त्यामुळे या घराला निवडणुकीचं स्वरुप मिळालं आहे. यामध्येच उत्कर्षने त्याचं निवडणूक चिन्ह जाहीर करत हटके स्टाइलमध्ये मत मागितलं आहे.
दरम्यान, उत्कर्षचं निवडणुकीचं चिन्ह टॉर्च आहे. हे टॉर्च सामान्यांना कशाप्रकारे उपयोगी पडू शकते हे त्याने गाण्यातून मांडलं आहे. त्याच्यासोबतच आता घरातील अन्य स्पर्धदेखील प्रेक्षकांना मत देण्याचं आवाहन करणार आहेत. त्यामुळे कोणाची स्टाइल प्रेक्षकांना भावते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.