Bigg Boss Marathi 3 Episodes, 19 Oct: घरामध्ये रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे कॅप्टन्सी कार्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:10 PM2021-10-19T12:10:50+5:302021-10-19T12:17:05+5:30

Bigg Boss Marathi 3 : चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या कॅप्टन्सी कार्यात सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 19 Oct : Chal Re Bhoplya Tunuk Tunuk captaincy task in Bigg Boss Marathi house | Bigg Boss Marathi 3 Episodes, 19 Oct: घरामध्ये रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे कॅप्टन्सी कार्य !

Bigg Boss Marathi 3 Episodes, 19 Oct: घरामध्ये रंगणार 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे कॅप्टन्सी कार्य !

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये आतापर्यंत घरातून तीन जण बाहेर पडले आहेत. त्यात शिवलीला पाटील यांनी तब्येतीचे कारण घेत शोमधून काढता पाय घेतला आहे. नॉमिनेशनमध्ये अक्षय वाघमारे आणि मागच्या आठवड्यात सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत. तर घरामध्ये नुकतीच एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे ती म्हणजे आजी. (Bigg Boss Marathi 3)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यात आवडत्या - जवळच्या सदस्याची एन्ट्री झाली आणि ती व्यक्ती म्हणजे आजी. आजीने काल गोष्टींमधील जादू खरी केली आणि घरामध्ये ठेवला जादूचा दिवा. ज्या दिव्याद्वारे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली. घरामध्ये पार पडले “इच्छा माझी पुरी करा” हे नॉमिनेशन कार्य. आणि या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह. आता बघूया या सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाणार आणि कोण सेफ होणार. 


आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. जो एक सदस्य सर्व फेर्‍यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे. हा सदस्य कोण असेल हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड पहावा लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Episodes, 19 Oct : Chal Re Bhoplya Tunuk Tunuk captaincy task in Bigg Boss Marathi house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.