Bigg Boss Marathi 3, Episodes, 22 Dec: घरातून आणखी एक स्पर्धक होणार OUT; आता BB house मध्ये राहणार फक्त ५ जण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:15 IST2021-12-22T18:15:00+5:302021-12-22T18:15:00+5:30
Bigg Boss Marathi 3: आता घरात टॉप ६ फायनलिस्ट राहिले असून यातील एका स्पर्धकाला हा खेळ सोडावा लागणार आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 22 Dec: घरातून आणखी एक स्पर्धक होणार OUT; आता BB house मध्ये राहणार फक्त ५ जण
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून चर्चेत येणाऱ्या 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi 3) या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले लवकरच रंगणार आहे. १५ स्पर्धकांपासून सुरु झालेला हा प्रवास आता शेवटच्या ६ स्पर्धकांवर येऊन ठेपला आहे. आता घरात टॉप ६ फायनलिस्ट राहिले असून यातीलही एका स्पर्धकाला हा खेळ सोडावा लागणार आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस मोठी घोषणा करताना दिसत आहे. यामध्ये विशाल निकम सोडून घरातील अन्य ५ स्पर्धकांपैकी एकाला या शोचा निरोप घ्यावा लागणार आहे.
घरातील ६ स्पर्धकांपैकी विशाल निकम हा ग्रँड फिनालेमध्ये जाणारा फर्स्ट फायनलिस्ट ठरला आहे. त्यामुळे घरातील अन्य ५ जणांना ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.यामध्येच बिग बॉसने केलेल्या घोषणेमुळे.