Bigg Boss Marathi 3, Episodes, 22 Oct: आजी घेणार घराचा निरोप, सदस्यांना अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:20 AM2021-10-22T11:20:31+5:302021-10-22T11:20:52+5:30
Bigg Boss Marathi 3 : इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले.
एका आठवड्याआधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाले आणि ती व्यक्ती म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले. सदस्यांनी आजीसोबत बराच वेळ घालवला, तिच्यासमोर थोडी भांडण झाली, आजीचा खाऊ सगळ्यांनी मिळून खाल्ला, तिच्याशी गप्पा मारल्या... पण आज वेळ आली आहे घरामधून आजीचा निरोप घेण्याची. आजीचा आवाज पुन्हा एकदा आणि शेवटचा घरामध्ये घुमला.
आजी म्हणाली, “मला इथे येऊन एक आठवडा झाला सुद्धा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेले असेल ते मला सांगाना...” आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले. सगळेच सदस्य अत्यंत भावुक झाले. आणि मीराने आपल्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर मांडली.
बस्स दिसत राहा कधी कधी... ! - मीरा
मीरा म्हणाली, “आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हते माझ्याबरोबर तेव्हा मला वाटायचे. माझी आई देखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती. अगदी १६ – १७ वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे तुझ्याशिवाय... पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळे असे कनेक्शन वाटले होते. म्हणजे समोर आहे बस एवढेच हवे आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. बस्स दिसत राहा कधी कधी... !
अजून कोणत्या सदस्यांनी आपल्या मनातल्या भावना आजीसमोर आज व्यक्त केल्या ते आजच्या भागामध्ये समजेल.