Bigg Boss Marathi 3, Episodes, 25 Oct : 'आता आपण आविष्कार सारखे खेळूया' - जय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 13:11 IST2021-10-25T13:10:49+5:302021-10-25T13:11:17+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल आदिश वैद्य घराबाहेर पडला.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 25 Oct : 'आता आपण आविष्कार सारखे खेळूया' - जय
बिग बॉस मराठीच्या घरामधून काल आदिश वैद्य घराबाहेर पडला. महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. आता नवा आठवडा सुरू होणार आहे आणि नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दादूस यांना कन्फेशन रूममध्ये बिग बॉस यांनी बोलावले आणि इतर सदस्य जेव्हा कन्फेशम रूममध्ये पोहचले तेव्हा त्यांना तिथून दादूस गायब झालेले दिसले. नक्की काय झाले ? कुठे गेले दादूस ? हा प्रश्न सदस्यांना आणि प्रेक्षकांना देखील पडला असेलच.
आज जय, मीरा, उत्कर्ष आणि गायत्री एका मुद्द्यावरून घरामध्ये संभाषण करताना दिसणार आहेत. जय आणि उत्कर्ष एका गोष्टीवर बोलत असताना जय म्हणाला, “काय करायचे तर ते कर मला नको विचारूस. मी काहीतरी बोलायला जातो, उलट माझ्यावर येते... मी आता काही बोलणारच नाहीये. मीराचे त्यावर म्हणणे होते, मला सुद्धा हेच बोलले जाते. जय यावर म्हणाला, मला असे वाटते आपण आता कसे खेळले पाहिजे आविष्कार दादासारखे... रविवारी सुरक्षित व्हायचे आणि झोपून जायचे. उत्कर्षने जयला समजावले, सरांना खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून... आपण ते केलेच पाहिजे. जसे सर म्हणतात सूर गवसेल तुम्हाला... कळणार आपल्याला. जय म्हणाला, “सर जे म्हणाले मला तू स्ट्रॉंग प्लेयर आहेस, सरांना एकच प्रॉब्लेम आहे माझा राग… तर मी फक्त टास्कमध्येच खेळणार बाकी शांत बसणार.” आज काय काय घडणार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ते आजच्या भागात समजेल.