Bigg Boss Marathi 3 Episodes, 30 Sep: एकीकडे पाण्याचा मारा तर दुसरीकडे शब्दांचा!, विशाल आणि अक्षयमध्ये झाली बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:22 IST2021-09-30T15:21:58+5:302021-09-30T15:22:23+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु आहे

Bigg Boss Marathi 3 Episodes, 30 Sep: एकीकडे पाण्याचा मारा तर दुसरीकडे शब्दांचा!, विशाल आणि अक्षयमध्ये झाली बाचाबाची
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु आहे. टीम ए आणि टीम बी मध्ये शाब्दिक वाद चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत. आज मोटर बाईक बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुध्द टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क आज कसा रंगणार ? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईक बसू शकतील ? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील ?
विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबण्याच पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार हे बघूया. टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्यांच्या डोक्याने नाही खेळत”. आता हा वाद कुठे थांबणार ? पुढे काय होणार ? हे आजच्या भागात समजणार आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना येऊन एक आठवडा उलटला आहे आणि घरातील एक स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडली. ही स्पर्धक म्हणजे शिवलीला पाटील.
शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले.