'एज्युकेशन लोन भरलं अन् दहाव्या दिवशी...'; स्ट्रगल काळातील आठवणींमुळे मीनल शाह भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:53 AM2022-01-03T11:53:44+5:302022-01-03T11:54:11+5:30
Meenal shah:बिग बॉस'च्या घरातील या स्ट्राँग स्पर्धकाने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे तिने शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेला स्ट्रगल
छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं (bigg boss marathi 3) पर्व चांगलंच गाजलं. उत्तम टास्क खेळण्यासोबतच घरातल्यांची एकमेकांसोबत झालेली मैत्री यामुळे हे पर्व गाजलं. विशेष म्हणजे या पर्वातील काही मोजक्या कलाकारांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे मीनल शाह (meenal shah). 'बिग बॉस मराठी ३'ची सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून मीनला खास ओळख मिळाली. टास्क खेळण्याची पद्धत असो वा घरातील कामं असं प्रत्येक गोष्टीत मीनलने तिचं वेगळेपण जपलं. परंतु, 'बिग बॉस'च्या घरातील या स्ट्राँग स्पर्धकाने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे तिने शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेला स्ट्रगल. रोडिजच्या ऑडिशनमध्ये मीनलने तिच्या लोनविषयी एक किस्सा सांगितला होता. यात लोन फेडल्यानंतर ती कशी 'रोडिज'मध्ये आली हे तिने सांगितलं.
"ज्यावेळी मी १३ वर्षांची होते तेव्हा माझे आई-वडील विभक्त झाले. पण माझ्या आईने खूप कष्टाने मला आणि माझ्या भावाला वाढवलं आहे. यातून एक गोष्टी मी शिकले की जर आयुष्यात काही करायचं असेल तर आधी स्वत:ची मदत करा. तरच तुम्ही इतरांची मदत करु शकता. १० वी झाल्यानंतर मी कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच डान्सचे क्लास घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून मग माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. एमटेक इन बायोलॉजीपर्यंत मी माझं शिक्षण केलं. पण हे शिक्षण पूर्ण करणं खूप खर्चिक होतं", असं मीनल म्हणाली.
पुढे ती म्हणते, "शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी शैक्षणिक कर्ज घेतलं होतं. पण १० वी नंतर जशी मी कमवायला लागले मी कधीच खर्चासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी घरातल्यांकडून पैसे घेतले नाहीत. कुटुंबाला सुद्धा वेळोवेळो मानसिक, आर्थिक मदत केली. पण एक मी फक्त स्ट्रगलचं केलं नाही. तर तो काळ एन्जॉय सुद्धा केला. ज्यावेळी माझ्या हातात पैसे येतात तेव्हा मला एका गोष्टीची जाणीव होते की आपल्यावरची जबाबदारी वाढतीये. मला कधीपासून रोडिजमध्ये यायचं होतं. पण, मला पहिले माझी जबाबदारी पूर्ण करायची होती. त्यामुळे १० दिवसांपूर्वी मी माझं सगळं कर्ज फेडलं आहे आणि आज इथे तुमच्यासमोर उभी आहे."
दरम्यान, अनेक संकट, हालाखीची परिस्थिती, स्ट्रगल हे सारं पाहिल्यामुळे मीनल आज मानसिकदृष्ट्या स्टाँग झाली आहे. तिच्या वागण्या-बोलण्यातूनदेखील हे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळेच सध्या तिच्या ऑडिशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.