'तुझ्यावर उधळलेले पैसे परत दे'; ब्रेकअपनंतर मीनल शाहकडे एक्स बॉयफ्रेंडने मागितला होता खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 10:34 AM2022-01-03T10:34:57+5:302022-01-03T10:35:37+5:30

Meenal shah: 'बिग बॉस'च्या घरातील या स्ट्राँग स्पर्धकाने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे.

bigg boss marathi 3 fame meenal shah shares her breakup experience | 'तुझ्यावर उधळलेले पैसे परत दे'; ब्रेकअपनंतर मीनल शाहकडे एक्स बॉयफ्रेंडने मागितला होता खर्च

'तुझ्यावर उधळलेले पैसे परत दे'; ब्रेकअपनंतर मीनल शाहकडे एक्स बॉयफ्रेंडने मागितला होता खर्च

googlenewsNext

छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं (bigg boss marathi 3) पर्व चांगलंच गाजलं. उत्तम टास्क खेळण्यासोबतच घरातल्यांची एकमेकांसोबत झालेली मैत्री यामुळे हे पर्व गाजलं. विशेष म्हणजे या पर्वातील काही मोजक्या कलाकारांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे मीनल शाह (meenal shah). 'बिग बॉस मराठी ३' ची सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून मीनलला खास ओळख मिळाली. परंतु, 'बिग बॉस'च्या घरातील या स्ट्राँग स्पर्धकाने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. यामध्येच ब्रेकअप झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडने कसे पैसे मागितले होते हेदेखील तिने सांगितलं. 

"जेव्हा माझ्या ब्रेकअप झाला त्यावेळी मी प्रचंड कोलमडून गेले होते. माझे वडील आमच्या आयुष्यातून गेले त्यावेळी एक मुलगा माझ्या आयुष्यात आला होता.  माझ्या त्या परिस्थितीत त्याने मला खूप मार्गदर्शन केलं. जवळपास ४ वर्ष आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. पण त्या ब्रेकअपच्या काळात माझी परिक्षा सुरु होती आणि एकदा रात्री मी बिल्डिंगखाली गेले आणि प्रचंड रडले. पण एक मनाशी खूणगाठ बांधली की यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा नाही. मग ते वडील असो बॉयफ्रेंड असो वा अन्य कोणी", असं मीनल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "गोष्ट येवढ्यावरच नव्हती. दुसऱ्या मुलीसोबत पकडला गेल्यानंतरही त्याच्यात सुधारणा नव्हती. मी तुझ्यावर आजपर्यंत जितके पैसे खर्च केलेत ते सगळे मला परत दे. तू माझ्यासाठी कोणी खास नाहीस, असं तो मला म्हणाला. त्याच्या या वाक्यानंतर मला प्रचंड राग आला होता. कारण, आपण प्रेमात होतो. माझी परिस्थिती तुला माहित होती. जेव्हा जेव्हा आपण बाहेर फिरायला गेलो तू स्वत: पैसे खर्च केले होते. मी तुला सांगितलं नव्हतं. पण त्या दिवसानंतर एक निश्चय केला की यापुढे जो कोणी आयुष्यात येईल तो असं सहज माझं मन दुखावून जाणार नाही".

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मीनलचा रोडिजच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ऑडिशनमध्ये मीनलने तिच्या कौटुंबिक, शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे.

Web Title: bigg boss marathi 3 fame meenal shah shares her breakup experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.