Bigg Boss Marathi 3 फेम स्नेहा वाघ पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर, नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 19:14 IST2022-01-14T19:14:22+5:302022-01-14T19:14:47+5:30
बिग बॉस मराठी ३ मधून (Bigg Boss Marathi 3) बाहेर पडल्यानंतर त्यांना इतर काही प्रोजेक्टस करण्याची संधी मिळत आहे. उत्कर्ष, जय, मीरानंतर आता या यादीमध्ये स्नेहा वाघचा देखील समावेश झाला आहे.

Bigg Boss Marathi 3 फेम स्नेहा वाघ पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर, नव्या भूमिकेत
बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) हा रिएलिटी शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यात सहभागी झालेले स्पर्धक सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. एवढेच नाही तर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना इतर काही प्रोजेक्टस करण्याची संधी मिळत आहे. उत्कर्ष, जय, मीरानंतर आता या यादीमध्ये स्नेहा वाघ (Sneha Wagh)चा देखील समावेश झाला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील स्नेहा वाघ देखील सर्वात स्ट्राँग स्पर्धक होती. मात्र तिचा घरातील प्रवास अपेक्षेपेक्षा लवकर संपला. या शोच्या निमित्ताने स्नेहा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सक्रीय झाली आहे. आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
स्नेहा वाघ दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
आता स्नेहा वाघ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा एका मराठी रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणार आहे. लवकरच याबाबतीत अधिकृत घोषणा केली जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, स्नेहा वाघने सांगितले की, 'मला मराठी सिनेसृष्टीत कमबॅक करायचे होते. मात्र मी एका चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत होते आणि ती संधी मला मिळाली आहे. स्नेहा कोणत्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे, याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र स्नेहा वाघचे चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.