Bigg Boss marathi 3: ग्रँड फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांची उपस्थिती; फक्त शिवलीला missing?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:24 IST2021-12-26T22:23:16+5:302021-12-26T22:24:22+5:30
Bigg Boss Marathi 3 Grand Finale: प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला हिला हा शो अर्ध्यावर सोडावा लागला होता

Bigg Boss marathi 3: ग्रँड फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांची उपस्थिती; फक्त शिवलीला missing?
सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठीच्या(bigg boss marathi) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगत आहे. या सोहळ्यामध्ये फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी यंदाच्या पर्वात सहभागी झालेले सगळे स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र, या स्पर्धकांच्या गर्दीत केवळ शिवलीला मिसिंग असल्याचं पाहायला आहे. त्यामुळे शिवलीला (shivleela)कुठे गेली? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला यांनी सहभाग घेतला होता. मात्र,ती या शोमध्ये आल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं. त्यामुळे तिने शोच्या माध्यमातूनही अनेकांची माफी मागतली होती. परंतु, हा शो सुरु असतानाच प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला हिला हा शो अर्ध्यावर सोडावा लागला. मात्र, आता बिग बॉसच्या घरात ग्रँड फिनाले रंगत असताना प्रत्येक स्पर्धक उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ शिवलीला नसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, या ग्रँड फिनालेमध्ये शिवलीला का नाही?तिने मुद्दाम या कार्यक्रमात येण्याचं टाळलं आहे का? की अन्य कोणतं कारण आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, याविषयी शिवलीला किंवा कार्यक्रमाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.