Bigg Boss Marathi 3 :'मला कॅप्टन बनायचं आहे..', मीनलने मीराला दिली डील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:47 IST2021-11-03T16:47:38+5:302021-11-03T16:47:57+5:30
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते.

Bigg Boss Marathi 3 :'मला कॅप्टन बनायचं आहे..', मीनलने मीराला दिली डील
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते. कारण कॅप्टन्सीसोबत सदस्यांना मिळते एका आठवड्याची इम्युनिटी जी अत्यंत महत्वाची असते आणि आता हे सदस्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो वा आठवड्याच्या सुरुवातीला असो डील करायला तयार होत आहेत. (Bigg Boss Marathi 3) तसेच झाले मीनलच्या बाबतीत तिने टास्क सुरू होण्याआधीच मीराला डीलसाठी विचारले आणि याबाबतीच आज विशाल, गायत्री आणि मीरा मध्ये आज चर्चा होणार आहे, जिथे मीरा ही गोष्ट विशालला सांगणार आहे.
मीरा विशालला म्हणाली, मला कॅप्टन नाही बनू द्यायचे, त्यांचे असे आहे की त्यालाच बनायचे आहे. मी मीनलला सांगणार होते पण मग मी म्हटले त्यांच्या टीममध्ये आहे तिला कळेल नाही तर जाऊ दे... माझे काम नाही तिला जाऊन सांगणे. तोंडावर क्लियर ते बोले आहेत काही असू देत आम्ही जयलाच कॅप्टन बनवणार. माझे असे झाले टीम जिंका तरी आधी. मीनल गेम चालू व्हायच्या आधीच माझ्याकडे आली होती माहिती आहे का...डील घेऊन. मी तिला म्हटल गेम सुरू तर होऊ दे. मला कॅप्टन बनायचे आहे, मी म्हटले मला पण व्हायच आहे कॅप्टन. तिचे असे होते मी हारायचे आणि तिला कॅप्टन बनू द्यायचं. विशाल त्यावर म्हणाला, “हे मी पण नाही करणार. जरी आम्ही एका टीममध्ये असतो तरी नसते केले मी.” पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन तिसराचा आजचा एपिसोड पहा.