Biggg Boss Marathi: मिनलला करावं लागणार टक्कल?; मीराची खेळी पडणार भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 14:10 IST2021-10-27T14:09:54+5:302021-10-27T14:10:22+5:30
Bigg boss marathi 3: जय आणि मीरा एक युक्ती लढवणार असून त्यांची ही युक्ती मिनलवर भारी पडणार आहे.

Biggg Boss Marathi: मिनलला करावं लागणार टक्कल?; मीराची खेळी पडणार भारी
'बिग बॉस मराठी'च्या (Biggg Boss Marathi) घरात सध्या सदस्यांना 'संयमाची ऐशी तैशी' हा नवा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये डेव्हिल झालेले सदस्य स्वर्गातील सदस्यांना वाट्टेल तसा त्रास देत आहेत. विशेष म्हणजे स्वर्गातील सदस्य सुद्धा अत्यंत संयमाने हा टास्क खेळत असून प्रतिस्पर्धींने दिलेलं कार्य पूर्ण करत आहेत. यामध्येच आता जय (jay dudhane) आणि मीरा(mira jagannath) एक युक्ती लढवणार आहेत. परंतु, त्यांची ही युक्ती मिनलवर भारी पडणार आहे. कारण, ते मिनल किंवा विकासला टक्कल करायला सांगणार आहेत.
संयमाची ऐसी तैशी या टास्कमध्ये जय, मीरा आणि तृप्ती देसाई या नरक टीममध्ये आहेत. तर, मिनल आणि विकास स्वर्गाच्या टीममध्ये. त्यामुळेच आज रंगणाऱ्या टास्कमध्ये जय-मीरा हे दोघं मिनल व विकासला टक्कल करण्याचा टास्क देणार आहे.
"आपण त्यांना केस कापायला सांगू. ती करणार नाही बघ", असं जय म्हणाला. त्यावर, "मी तेच म्हणतीये विकास आणि मिनलला सांगायचं. फक्त केस कापायला नाही. तर पूर्ण टक्कल करायला सांगायचं", असं मीरा म्हणते.
दरम्यान, जय आणि मीराची ही खेळी कितपत यशस्वी होणार? टास्कसाठी मिनल खरंच सगळे केस कापून टक्कल करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.