Bigg Boss Marathi 3: 'आज परत कळलं विकास पाटील काय आहे'; विकासच्या दुटप्पी स्वभावामुळे जय संतापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 14:50 IST2021-10-28T14:50:02+5:302021-10-28T14:50:02+5:30
Bigg boss marathi 3:या सगळ्यामध्ये दोन्ही टीममधील सदस्य आता विकास आणि विशाल या दोघांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi 3: 'आज परत कळलं विकास पाटील काय आहे'; विकासच्या दुटप्पी स्वभावामुळे जय संतापला
बिग बॉसच्या(bigg boss marathi) घरात सध्या संयमाची ऐशी तैशी हा टास्क नवीन टास्क रंगत आहे. या टास्कमध्ये दोन्ही टीममध्ये प्रचंड वाद झाले आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये दोन्ही टीममधील सदस्य आता विकास (vikas patil)आणि विशाल (vishal nikam) या दोघांवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. विकासने दादूसला आऊट केल्यामुळे विशालने त्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर याच मुद्द्यावरुन आज विकास आणि जयमध्ये वाद होणार आहे.
कोणी पण येऊन manipulate करणार,आणि हा तसा वागणार, असं जय विकासला म्हणतो. त्यावर विकास म्हणाला “मी माझी बाजू मांडणार, मी काही त्याला नाव खोड असं बोलो नव्हतो. मी माझ्या टीमकडून जे मला बोलायचे आहे ते बोलणार. मला टास्क रद्द करायचा नव्हता म्हणून मी त्याला एक गोष्ट सांगितली. आणि सगळ्यांनी बघितलं आहे, दादूसच्या चेहर्यावर शेवट पर्यंत स्माईल होतं”.
त्यावर जय म्हणाला," गुड फॉर यू ... ऑल द बेस्ट, आज परत कळलं विकास पाटील काय आहे ते. मग मीरा आणि आविष्कारच्या वेळेला तू का नाही माघार घेतलीस. किती खोट बोलतोस तू विकास,” असं म्हणत पुन्हा जय-विकासमध्ये वाद होणार आहे.