Bigg Boss marathi 3: जय दुधाने देतोय नीथा शेट्टीला टास्कबद्दल सल्ले,काय असणार त्याची पुढची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 12:07 PM2021-11-02T12:07:09+5:302021-11-02T12:07:33+5:30
Bigg Boss Marathi 3: घरामध्ये आज रंगणार्या साप्ताहिक कार्यामध्ये सगळीच समीकरण बदलेली दिसणार आहेत. जय आणि गायत्री मधले नाते असो वा उत्कर्ष – जय मधली नाराजी असो. पण, टास्क म्हंटल की सदस्य आपल्यातील भांडण विसरून एकत्र येतात.
बिग बॉस मराठीच्या घरात दुसर्या वाईल्ड कार्ड सदस्याची म्हणजेच नीथा शेट्टी – साळवी हिची एंट्री झाली. ती घरामध्ये जाण्यापूर्वीच चर्चा रंगली होती.तिच्या एंट्रीने मात्र घरातले काही सदस्यांनी तिच्या येण्याचा चांगलाच धसका घेतला होता. हळुहळु निथा आता घरातल्या स्पर्धकांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. घरात कशाप्रकारे स्पर्धक एकमेकांविरुद्ध कटकारस्थानं रचतात हे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये तिची मदत करतोय स्पर्धक जय दुधाने.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार्या साप्ताहिक कार्यामध्ये सगळीच समीकरण बदलेली दिसणार आहेत. जय आणि गायत्री मधले नाते असो वा उत्कर्ष – जय मधली नाराजी असो. पण, टास्क म्हंटल की सदस्य आपल्यातील भांडण विसरून एकत्र येतात. आजच्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामध्ये नक्की काय होणार ? कोण कोणाच्या विरोधात खेळणार ? कोणामध्ये राडे होणार ? संचालक फेयर खेळणार का ? कोणाचा डब्बा गुल होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
आज टास्क दरम्यान गायत्री मीनलला सांगताना दिसणार आहे “असं नको व्हायला ते दोघेच खेळत आहेत, प्लीज डोन्ट लेट दॅट हॅप्पन.” आता गायत्री हे जय आणि उत्कर्षबद्दल बोलते आहे की विशाल आणि विकासबद्दल आहे की कोना दुसर्याबद्दल हे आज कळेलच. तर दुसरीकडे, जय नीथाला खेळ कसा पुढे जातो आणि कसा खेळावा असे सांगणार आहे. जय नीथाला समजवताना दिसणार आहे, “रिबिन तर कापायचीच आहे बॉक्सवरची, पण जर आपल्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडे जास्त तर “game is all about संचालक” संचालक ठरवणार अप्रुव्ह करायचे की डिसअप्रुव्ह करायचे. जर आपल्याकडे १० आहेत आणि त्यांच्याकडे १५ बॉक्स आहेत तर आपल्याला त्यांचे ५ आपल्याकडे आणायचे आहेत हा हेतु आहे. त्याच्यामध्ये