Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या चावडीवर मीरा आणि गायत्रीची घेतली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 20:57 IST2021-10-16T20:57:11+5:302021-10-16T20:57:43+5:30
Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर मीरा जगन्नाथ आणि गायत्रीची शाळा घेतली.

Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या चावडीवर मीरा आणि गायत्रीची घेतली शाळा
बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन आता मनोरंजक वळणावर आला आहे. घरात दररोज नवीन वादविवाद आणि भांडणे पहायला मिळत आहेत. तर घरातील काही सदस्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. दरम्यान आता बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 3) चावडीवर मीरा जगन्नाथ आणि गायत्रीची शाळा घेतली.
कलर्स मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत लिहिले की, महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या चावडीवर का बरं घेतलीय मीरा आणि गायत्रीची शाळा? या व्हिडीओत पहायला मिळत आहे की महेश मांजरेकर मीरा आणि गायत्रीला उद्देशून बोलत आहेत. ते म्हणाले की, मीरा आणि गायत्रीने ठरविले की हट आम्ही काहीच कामे करणार नाहीत. मग पुन्हा तिथे जाऊन लुडबूड करणार. मला एक गॅस द्या, मला हे द्या. मला एक माचिस द्या. अख्खा वेळ माचिस टाकत असता. मीरा पुढच्या वर्षी तू तुझा प्रोग्राम सुरू कर मीच बॉस म्हणून.
आणखी एक बिग बॉसचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात महेश मांजरेकर आदिश वैद्यला खडेबोल लगावताना दिसत आहेत. त्यांनी त्याला म्हटले की, तू किती छळत होतास त्या स्नेहाला. ती काही बोलत नाही. तरीदेखील सारखे तेच. नंतर कंटाळा आला तुला काय करायचे होते, तुझी बाजू समजावून सांगायची होती का. त्यावर उत्तर देताना आदिश मी एफर्ट्स घेत होते. नंतर उत्तर मिळत नाही म्हणून मला वाटले की तिथे आता थांबूयात आपण. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याला चांगलेच सुनावले.