Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातील हा सदस्य बालपणी होता खूप खोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:35 IST2021-09-29T18:34:04+5:302021-09-29T18:35:05+5:30
बिग बॉस मराठीचा तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन एक आठवडा उलटला आहे. या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातील हा सदस्य बालपणी होता खूप खोडकर
बिग बॉस मराठी सीजन ३ च्या दुसऱ्या आठवड्याला हल्लाबोल टास्क द्वारे जोरदार सुरूवात झाली. विविध कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे एकमेकाबरोबरचे मतभेद, वादविवाद आणि मैत्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरतेय. दरम्यान, आपल्या लाडक्या स्पर्धकाच्या मजेशीर किस्स्यांचा देखील प्रेक्षक आस्वाद घेतात, असाच एक किस्सा अक्षय वाघमारेचा आहे.
बिग बॉसच्या घरातला संयमी आणि तितकाच चतूर खेळाडू असलेला अक्षय लहानपणी खूप खोडकर होता. त्याने स्वत: त्याच्या लहानपणीचे किस्से शेअर केले आहेत.
लहानपणी अक्षयला इतर मुलांप्रमाणे गोट्या खेळण्याचा खूप छंद होता. पुणे विद्यापीठ परिसरातील चाळीत राहत असताना अक्षय गोट्या खेळण्यासाठी दूरवर जायचा, त्यादरम्यान मागे लागलेल्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना, एका मोठ्या खड्ड्यात पडून त्याने आपली ढोपरं देखील फोडून घेतली होती.
अक्षयने आणखीन एक किस्सा सांगितला, लहानपणी शाळेत तासाला बाई शिकवत असताना गपचूप फळ्यावर लेजर लाईट मारून खोड्या काढायचा. पण, अभ्यासात हुशार आणि स्पोर्ट्स मध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्यामुळे त्याच्या या खोड्या शिक्षक माफ करत असत.असा हा अक्षय बिग बॉसच्या पटलावर टिकून राहण्यासाठी कोणते फासे टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.