Bigg Boss Marathi 3: काही इंटरेस्ट नाही यांच्यात...! जय आणि स्रेहाच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 01:51 PM2021-10-29T13:51:44+5:302021-10-29T13:53:23+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात मागच्या काही दिवसांपासून जय आणि स्नेहा यांच्यातील मैत्री वाढताना दिसतेय. अर्थात ही मैत्री प्रेक्षकांना अजिबात रूचलेली नाही. होय, सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच दिसतंय.
‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3 ) अपेक्षेनुसार गाजतोय. स्पर्धकांची चर्चा जोरात आहेत. भांडणांची, वादांचीही चर्चा होतेय. शिवाय जय दुधाणे (Jay Dudhane)आणि स्रेहा वाघ ( Sneha Wagh ) यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा आहे. होय, बिग बॉस मराठीच्या घरात मागच्या काही दिवसांपासून जय आणि स्नेहा यांच्यातील मैत्री वाढताना दिसतेय. अर्थात ही मैत्री प्रेक्षकांना अजिबात रूचलेली नाही. होय, सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच दिसतंय. अशात स्रेहा व जयचा एक व्हिडीओ कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आलाये आणि तो पाहून नेहमीप्रमाणे चाहत्यांनी ‘नको त्या’ कमेंट्स केल्या आहेत.
होय, या व्हिडीओत जय व स्रेहा गार्डन एरियात बसून कुजबुज करताना दिसत आहेत. तू कॅप्टन झाल्यावर मला काय ड्युटी देणार? असं जय स्रेहाला विचारते. यावर स्रेहा जोरजोरात हसते. मग एका टास्कवर दोघंही चर्चा करतात.
जय व स्रेहा व्हिडीओत तशा नॉर्मल गोष्टी करताहेत. पण हा नॉर्मल गोष्टीही का कुणास ठाऊक चाहत्यांना आवडल्या नाहीत. वैतागलेल्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. ‘यांचं का दाखवताय यार, कंटाळा येतो आणि घाण वाटतं,’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. काही इंटरेस्ट नाही यांच्यात, अशी कमेंट या व्हिडीओवर एका चाहत्याने केली. जयसमोर ओव्हरअॅक्टिंग करते ही, अशा आशयाची प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.
‘यार या दोघांना वेगळं करा..हिच्यामुळे जय नीट खेळत नाहीये. म्हणून हिला बाहेर काढा,’ अशा शब्दांत एका युजरने स्रेहाला ट्रोल केलं आहे. किती फालतुगिरी, बकवास, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत.
एकंदर काय तर स्रेहा आणि जयची जोडी आणि त्यांची वाढती मैत्री प्रेक्षकांना वैताग आणणारी ठरतेय. आता हे कधी बंद होणार, ते बघूच.