Bigg Boss Marathi 3: नवा आठवडा नवे टास्क... टास्क ऐकून सदस्यांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:49 AM2021-11-22T11:49:20+5:302021-11-22T11:50:31+5:30

Bigg Boss Marathi 3: आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा... घरामध्ये रंगणार नवे टास्क...

Bigg Boss Marathi 3: New Week New Task ... Members fall asleep listening to the task | Bigg Boss Marathi 3: नवा आठवडा नवे टास्क... टास्क ऐकून सदस्यांची उडाली झोप

Bigg Boss Marathi 3: नवा आठवडा नवे टास्क... टास्क ऐकून सदस्यांची उडाली झोप

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल स्नेहा वाघ घराबाहेर पडली. आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा... घरामध्ये रंगणार नवे टास्क... होणार राडे, बघायला मिळणार कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या विरोधात. नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण होणार नॉमिनेट आणि कोण कोणाला करणार सेफ. तसेच आठवड्याच्या शेवटी घराला मिळणार नवा कॅप्टन. कालसमोर आलेल्या प्रोमोमधून असू दिसून येत आहे, बिग बॉस मराठीच्या घराचे आता मुंबई शहरात रूपांतर होणार आहे.

बिग बॉस यांनी दिला सदस्यांना नवा आणि कठीण टास्क. त्यांनी जाहीर केले, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना जागे राहावे लागणार आहे. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की ! उत्कर्ष त्यावर लगेच गाणे म्हणायला लागला... मुझे निंद क्यु आये, कोई मुझको अब ये बताये... के ऐसा कैसा टास्क आ गया !

गायत्री दातार बनली घराची कॅप्टन
आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले... घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील झाले भांडण… दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्या कारणाने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा... गायत्री दातार घराची कॅप्टन बनली आहे. नेमके बिग बॉसच्या घरात काय घडणार आणि काय असेल हा टास्क ? हे आजच्या भागात समजेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3: New Week New Task ... Members fall asleep listening to the task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.