Bigg Boss Marathi 3 : चक्क विशाल झोपला बाथरूममध्ये ?, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 15:00 IST2021-11-25T14:59:31+5:302021-11-25T15:00:04+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहणे तितके सोप्पे नाही हे आता सदस्यांना कळून चुकले आहे.

Bigg Boss Marathi 3 : चक्क विशाल झोपला बाथरूममध्ये ?, जाणून घ्या याबद्दल
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहणे तितके सोप्पे नाही हे आता सदस्यांना कळून चुकले असणार. काल बिग बॉस यांनी केलेल्या घोषणेनुसार घरातील जे दोन सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ ठरले त्यांना बिग बॉस यांनी दिलेल्या अवघड शिक्षेस सामोरे जावे लागेल असे सांगितले, आणि यासाठीच गायत्री, सोनाली आणि विकास यांनी उत्कर्ष आणि विशालची नावे घेतली. त्यामुळे त्यांना रात्रभर जागावे लागणार आहे. यामुळेच कुठे ना कुठे विशाल आणि उत्कर्ष यांना झोप अनावर झाल्याचे आजच्या भागामध्ये दिसणार आहे.
विशाल बाथरूममध्ये झोपला ? हो जय आणि मीरा तिथे गेले असता त्यांना असे आढळून आले. विशाल आतच झोपी गेला आणि तो बाहेर आल्यानंतर जयने त्याला तशी विचारणा देखील केली... तर दूसरीकडे उत्कर्षला झोप अनावर झाली आहे, असे निदर्शनास आले आहे. उत्कर्षला गायत्रीने सांगितले झोपू नकोस त्यावर तो गायत्रीला म्हणाला, हवा टाईट आहे गं...
बिग बॉस मराठी ३च्या चावडीवर भाईजानची हजेरी
बिग बॉस मराठी सीझन ३च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे...कारण आपल्या सगळ्यांचा लाडका भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा होस्ट सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे...घरातील सदस्य सलमान खानला बघून खुश तर होणारच पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे असे म्हणायला हरकत नाही.